परभणी : शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या महिलांची आबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:17 AM2019-12-21T00:17:20+5:302019-12-21T00:19:28+5:30

तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार शिजवून देण्याची जबाबदारी असलेल्या २७७ स्वयंपाकी आणि मदतनीस महिलांना महिन्याकाठी केवळ १५०० रुपये तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. परिणामी शालेय पोषण आहार पुरवठा करणाºया महिलांची यामुळे मोठ्या प्रमाणावर आबाळ होत आहे.

Parbhani: Nourishment of women who provide school nutrition | परभणी : शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या महिलांची आबाळ

परभणी : शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या महिलांची आबाळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी(परभणी) : तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार पोषण आहार शिजवून देण्याची जबाबदारी असलेल्या २७७ स्वयंपाकी आणि मदतनीस महिलांना महिन्याकाठी केवळ १५०० रुपये तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. परिणामी शालेय पोषण आहार पुरवठा करणाºया महिलांची यामुळे मोठ्या प्रमाणावर आबाळ होत आहे.
केंद्र शासन पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना असून या योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार पुरविण्यात येतो. २०११ पासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी मान्यता प्राप्त शाळांमध्ये ही योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत शालेय पोषण आहार शिजवणे, आहार वाटप करणे व इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी मानधन तत्त्वावर स्वयंपाकी आणि मदतनीस महिलांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पाथरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १०२ आणि खाजगी मान्यता प्राप्त २७ शाळा आहेत. या शाळांमध्ये २७७ स्वयंपाकी आणि मदतनीस कार्यरत आहेत. स्वयंपाकी व मदतनिसांना रोज शाळेच्या वेळेत यावे लागते. आल्यानंतर आहार शिजवणे, शालेय साफसफाई करणे, मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय करणे आदी कामे करावी लागतात. ही कमे करीत असताना त्यांचा पूर्ण दिवस खर्ची होतो. या कामाच्या बदल्यात दरमहा त्यांना १५०० रुपये जे मानधन दिले जाते, ते कामाच्या मानाने तुटपुंजेच आहे. या मानधनावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचा खर्च तसेच दैनंदिन गरजा भागविल्या जावू शकत नाहीत. यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करणे गरजेचे आहे.
तुटपुंजे मानधन: महिलांची अडचण
४तुटपुंज्या मानधनावर त्यांचे काम सुरू असून, पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महिलांचे योगदान मोठे आहे. आठ ते दहा वर्षांपासून पोषण आहार शिजवून देण्याचे काम सुरु आहे.
४या महिलांना एप्रिल २०१९ पूर्वी केवळ १ हजार मानधन देण्यात येत होते. यानंतर शासनाने यावर्षी ५०० रुपये मानधनात वाढ केली आहे.
४मात्र ते मानधनही वेळेत मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन योजनेवर करोडो रुपये खर्च करत आहे. मात्र योजनेची अंमलबजावणी करणाºया महिलांची आबाळ होताना दिसून येत आहे.
‘मनरेगा’ ची मजुरी अधिक
४‘मनरेगा’ योजनेवर काम करणाºया मजूर महिलांना रोज २०३ रुपये मजुरी दिल्या जाते. मात्र या महिलांना ५० रुपये रोज मजुरी पडत आहे. याचाच अर्थ किती अडचणीत या महिला काम करत आहेत, हे त्यांच्या मानधनावरून दिसून येते.
शालेय पोषण आहार योजनेत काम करणाºया मदतनीस आणि स्वयंपाकींच्या मानधनाबाबत त्यांच्या संघटनाकडून मागणी कली जाते़ मात्र हा विषय शासनस्तरावरील आहे़ त्यामुळे मानधनाचा प्रश्नही शासनाकडूनच सुटला जावू शकतो़
-बी़टी़ गोरे,
विस्तार अधिकारी (शिक्षण), पाथरी

Web Title: Parbhani: Nourishment of women who provide school nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.