परभणी : टंचाई निवारणासाठी आता ३८ विंधन विहिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:39 AM2019-05-13T00:39:57+5:302019-05-13T00:40:17+5:30
जिल्ह्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३८ नवीन विंधन विहिरींचे खोदकाम करण्यास मंजुरी दिली आहे. १० मे रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, या कामांवर सुमारे २२ लाख ११ हजार ४४८ रुपयांचा खर्च होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ३८ नवीन विंधन विहिरींचे खोदकाम करण्यास मंजुरी दिली आहे. १० मे रोजी या कामांना प्रशासकीय मान्यता दिली असून, या कामांवर सुमारे २२ लाख ११ हजार ४४८ रुपयांचा खर्च होणार आहे.
मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे. आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्हावासिय पाण्यासाठी त्रासून गेले आहेत. ग्रामीण भागात ही परिस्थिती अधिकच गंभीर असल्याने विविध उपाययोजना करुन पाणी टंचाई निवारण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहेत. टँकर, विहिरींचे अधिग्रहण, नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती इ. कामे जिल्ह्यात सुरू झाली आहेत. काही भागात पाण्याचा कुठलाच स्त्रोत उपलब्ध नसल्याने नवीन विहिरी घेण्याशिवाय पर्याय नाही. ही बाब लक्षात घेऊन आता विंधन विहिरी घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात विहिरींची कामे सुरू होतील.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून नवीन विंधन विहिरी घेण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे प्राप्त झाले होते. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या सहायक भूवैज्ञानिकांनी तपासणी करुन खर्च व तांत्रिक बांबी तपासल्या असून, तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनीही शिफारस केल्याने ३८ नवीन विंधन विहिरींच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे.
एका विहिरीवर साधारणत: ५८ हजार १९६ रुपयांचा खर्च लागणार असून नवीन विंधन विहिरींची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणी टंचाईवरील ताण काही प्रमाणात हलका होईल, अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीत सर्वच तालुक्यांत टंचाईने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील टंचाईचे गांभीर्य लक्षात घेता मंजुरी मिळालेल्या विहिरींची कामे तातडीने हाती घेऊन ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
तीन दिवसांत : पूर्ण करावे लागणार काम
४नवीन विंधन विहिरींना मंजुरी देताना जिल्हाधिकाºयांनी काही अटी घालून दिल्या आहेत. निश्चित केलेल्या ठिकाणीच विंधन विहीर घ्यावी, विंधन विहिरींचे काम हातपंप उभारणीसह तीन दिवसंत पूर्ण करावे आणि तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा, वाडी, वस्ती, तांडा यांची लोकसंख्या किमान ५० असावी.
४नवीन विंधन विहिरींच्या परिसरात १ कि.मी. अंतरापर्यंत कोणत्याही पिण्याच्या पाण्याचे उद्भव असू नयेत, ६० मीटर खोलीपर्यंतच ही विंधन विहीर घेण्याचेही बंधन टाकण्यात आले आहे. २०० लोकसंख्येमागे एक विंधन विहीर घ्यावी. त्यानुसार गावाच्या लोकसंख्येच्या आणि पूर्वी घेतलेल्या आणि सद्यस्थितीत जिवंत विंधन विहिरींच्या संख्येचा विचार करुन नवीन विंधन विहिरीचे काम सुरू करावे.
या गावांत होणार विंधन विहीर
४मानवत तालुक्यात आंबेगाव (बु), थार, सारंगपूर, गंगाखेड तालुका- मसला, राणीसावरगाव, पाथरी तालुका - पाथरगव्हाण बु. (२), बाबुलतार, पोहेटाकळी, देगाव, विटा, लिंबा बनेवस्ती, बाभळगाव, गुंज खु., ढालेगाव.
४पूर्णा तालुका- आवलगाव, कलमुला, एकरुखा, पेनूर, गौर, शिरकळस, हाटकरवाडी, धानोरा मोत्या, कावलगाव वाडी, फुलकळस, खडाळा, परभणी तालुका - पिंपळा, जलालपूर, खानापूर, बाभुळगाव, आंबेटाकळी, ब्रह्मपुरी तर्फे पाथरी, मांडवा, डफवाडी, मोहपुरी, पाथरा.