परभणी :जिओ टॅगिंग करूनच होणार नरेगाची कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:08 AM2018-01-17T00:08:00+5:302018-01-17T00:10:25+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आता कोणतेही काम जिओ टॅगिंग शिवाय करता येणार नाही. त्यामुळे बनावट व कागदावरच होणाºया कामांना चाप बसणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आता कोणतेही काम जिओ टॅगिंग शिवाय करता येणार नाही. त्यामुळे बनावट व कागदावरच होणाºया कामांना चाप बसणार आहे.
ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा आणि विकासकामेही मार्गी लागावीत या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत केल्या जाणाºया कामांत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी होत्या. अनेक कामे आणि कामांवरील मजुरांची उपस्थिती, यातही गैरप्रकार झाल्याची ओरड होती. या गैरव्यहाराला पायबंद घालण्यासाठी शासनाने जिओ-टॅगिंग प्रणाली सुरू केली. या अंतर्गत भूवन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. मागील वर्षी जिओ- टॅगिंगचा पहिला फेज जिल्ह्यात पूर्ण झाला. मग्रारोहयोमध्ये २००८ पासून झालेल्या सर्व कामांचे जिओ- टॅगिंग करण्यात आले आहे.
नोव्हेंबर २०१७ पासून या योजनेच्या दुसºया टप्प्याला सुरुवात झाली आहे. आता या टप्प्पात महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या प्रत्येक कामांचे जिओ- टॅगिंग करणे बंधनकारक आहे. नरेगा अंतर्गत सिंचन विहीर, शेततळे, शौचालयाचे बांधकाम, शेत रस्ता, वृक्षारोपण आदी कामे केली जातात. जिओ-टॅगिंगचा दुसरा फेज सुरू झाल्याने आता या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन टाकलेल्या मार्क आऊटच्या लोकेशनसह जिओ- टॅगिंग करावयाचे आहे. हे जिओ टॅगिंग झाल्यानंतरच त्या कामाचे मस्टर तयार होणार आहे. त्याचप्रमाणे ३० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर आणखी एकदा कामाचे जिओ टॅगिंग आॅनलाईन करावयाचे असून, त्यानंतर १०० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर काम पूर्ण झाल्याचे टॅगिंग करावयाचे आहे. त्यानंतरच संबंधित कामाचे देयक अदा होणार आहे.
जिओ-टॅगिंगच्या दुसºया टप्प्याला जिल्ह्यात सुरुवात झाल्याने आता प्रत्येक कामाचे आॅनलाईन स्थळ आणि त्या कामाची स्थिती आॅनलाईन बघता येणार आहे. तसेच काम पूर्ण झाले की नाही, याची माहितीही एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. शिवाय रोहयो कामांतील गैरव्यवहारही कमी होणार आहे. रोहयो अंतर्गत होणारे प्रत्येक काम पूर्ण करावेच लागणार असून, यामाध्यमातून कामाला गतीही द्यावी लागणार आहे. त्यामुळे मनरेगा अंतर्गत होणाºया गैरव्यवहारांना जिओ-टॅगिंगच्या साह्याने आळा बसणार असून, कामेही पूर्ण होणार आहेत.
३०५ कामांचे फोटो आॅनलाईन
यावर्षी मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात ६०३ कामांना मंजुरी मिळाली आहे. मंजुरीनंतर कर्मचाºयांनी ३०५ कामांच्या मार्कआॅऊटचे फोटो भुवन पोर्टलवर आॅनलाईन अपलोड केले आहेत. आणखी २९८ कामांचे फोटो अपलोड करण्याचे काम शिल्लक आहे. ३०५ कामांचे फोटो पोर्टलवर अपलोड झाल्याने या कामांचा मस्टर नोंदणीचा मार्ग आता मोकळा झाला असून, लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे. उर्वरित कामांचे फोटो अपलोड करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती नरेगा विभागातून मिळाली.
यांच्यावर आहे जबाबदारी
महाराष्टÑ शासनाने भुवन हे अॅप्लिकेशन विकसित केले आहे. अँड्रॉईड बेसड् हे अॅप्लीकेशन जिल्ह्यातील संबंधित कर्मचाºयांना देण्यात आले आहे. या अॅप्लिकेशनवर फोटो क्लिक केल्यानंतर त्याचे लोकेशनही येणार आहे. मनरेगा अंतर्गत कामांना मंजुरी मिळाल्यानंतर ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक आणि तांत्रिक सहायकांनी त्या कामाचे फोटो भुवन पोर्टलवर अपलोड करावयाचे आहेत. हे फोटो अपलोड केल्यानंतरच मजुरांचे मस्टर तयार करण्यास मंजुरी मिळणार असून, पुढील कामाला प्रारंभ होणार आहे. काम सुरू होण्यापूर्वीचा फोटो अपलोड झाला नसेल तर त्या कामाला मंजुरीही मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक काम सुरू होण्यापूर्वी, त्यानंतर ३० टक्के काम झाल्यानंतर आणि काम पूर्ण झाल्यानंतर असे तीन वेळा आॅनलाईन फोटो अपलोड करावे लागणार आहेत.