परभणी : प्रवासी संख्येत दुप्पट वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:49 AM2018-11-11T00:49:52+5:302018-11-11T00:50:12+5:30

भाऊबीजेनंतर जिल्ह्यातील बसस्थानके आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ नियमित प्रवाशांपेक्षा दीड ते दोन पट प्रवासी संख्या वाढल्याने या प्रवाशांची वाहतूक करताना एसटी महामंडळ, रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़

Parbhani: Number of passengers doubled in number | परभणी : प्रवासी संख्येत दुप्पट वाढ

परभणी : प्रवासी संख्येत दुप्पट वाढ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भाऊबीजेनंतर जिल्ह्यातील बसस्थानके आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ नियमित प्रवाशांपेक्षा दीड ते दोन पट प्रवासी संख्या वाढल्याने या प्रवाशांची वाहतूक करताना एसटी महामंडळ, रेल्वे प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़
५ नोव्हेंबरपासून दिवाळीचा सण सुरू झाला़ या काळात बाहेरगावाहून मोठ्या संख्येने प्रवासी जिल्ह्यात दाखल झाले़ परभणी जिल्ह्यातील विविध भागातील नागरिक नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर आदी ठिकाणी वास्तव्याला आहेत़
दिवाळी सणासाठी हे नागरिक आपल्या कुटूंबासह गावाकडे परतले़ त्यामुळे एसटी बसेस आणि रेल्वे गाड्यांना प्रवाशांची संख्या वाढली होती़ पाच दिवसांचा दिवाळी सण संपला आहे़ शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुटीचे असून, अनेकांनी दिवाळीचा सण संपल्यानंतर नोकरीचे ठिकाण गाठण्यास सुरुवात केली आहे़ त्यामुळे पुन्हा एकदा बस आणि रेल्वे गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़
शनिवारी येथील बसस्थानकावर प्रवाशांची संख्या वाढली होती़ सकाळपासूनच प्रवासी स्थानकावर दाखल झाल्याचे पहावयास मिळाले़ बाहेरगावाहून येणाºया बसेस आधीच प्रवाशांनी फुल्ल होवून येत असल्याने बस गाड्यांमध्ये जागा मिळणे अवघड झाले होते़
अनेक बसेस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन धावत असल्याचेही दिसून आले़ एसटी महामंडळाच्या परभणी स्थानकात बस दाखल होण्यापूर्वीच या बसला प्रवाशांना गरडा पडत होता़ जागा मिळविण्यासाठी प्रवासी मिळेल त्या मार्गाने धडपड करीत असल्याचे पहावयास मिळाले़ कोणी खिडकीतून तर कोणी चालकाच्या केबीनमधून बसमध्ये प्रवेश करीत जागा मिळविण्याचा आटापिटा करीत होते़ लांब पल्ल्यांच्या बसेसबरोबरच जिल्हा अंतर्गत धावणाºया बसेसलाही मोठी गर्दी दिसून आली़
फेºया वाढवूनही गर्दी कायम
एसटी महामंडळाने दिवाळी सणासाठी विशेष फेºयांचे नियोजन केले आहे़ प्रवासी भारमान अधिक असलेल्या मार्गावर जादा फेºया करण्यात आल्या़ परंतु, तरीही गर्दी आटोक्यात आली नाही़ सर्वच बस गाड्या फुल्ल होवून धावत आहेत़ शनिवारी देखील हेच चित्र पहावयास मिळाले़ विशेष म्हणजे, ऐन दिवाळी सणाच्या काळात बस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे अनेक बसेस उशिराने धावल्या़ त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली़

Web Title: Parbhani: Number of passengers doubled in number

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.