परभणी : रबीसाठी ३१३ कोटींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:29 AM2018-10-08T00:29:05+5:302018-10-08T00:29:47+5:30

यावर्षीच्या रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले आहे़ एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप होत नसताना रबी हंगामासाठी कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना नियोजन करावे लागणार आहे़

Parbhani: Objective of 313 crores for Rabi | परभणी : रबीसाठी ३१३ कोटींचे उद्दिष्ट

परभणी : रबीसाठी ३१३ कोटींचे उद्दिष्ट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या रबी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने दिले आहे़ एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटप होत नसताना रबी हंगामासाठी कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना नियोजन करावे लागणार आहे़
यावर्षीचा खरीप हंगाम अंतिम चरणात असून, या हंगामातील पिके काढणीला आली आहेत़ जिल्ह्यात मूग बाजारात आला असून, अनेक भागांत सोयाबीनची काढणी सुरू आहे़ तर काही ठिकाणी सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीसाठीही येत आहे़ कापसाचे पीकही उत्पादन देण्याच्या अवस्थेत आले आहे़ अनेक भागांतील कापूस परिपक्व झाला असून, शेतकऱ्यांनी वेचणीला सुरुवात केली आहे़ कापसाच्या किमान चार वेचण्या होत असून, संपूर्ण कापूस बाजारात येण्यासाठी जानेवारी, फेब्रुवारी महिना उजाडणार असला तरी इतर पिकांचे उत्पादन बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात असून, शेती रबीसाठी तयार केली जात आहे़
सोयाबीन, मुगाची काढणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी रबी हंगामासाठी तयारीला लागतो़ यावर्षी रबी हंगामाची तयारी सुरू झाली असून, एक-दोन मोठे पाऊस झाल्यास प्रत्यक्ष रबीच्या पेरणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे़ कृषी विभागाने रबी हंगामाच्या लागवडीचे नियोजनही तयार करून ठेवले आहे़ त्यामुळे जिल्ह्यात आता रबीच्या हंगामाचे वेध लागले आहेत़ पेरण्यासाठी पैशांची जाडजोड लावली जात आहे़ दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने बँकांना रबी हंगामासाठी पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे़
त्यामुळे बँकांना हे उद्दिष्ट पूर्ण करून शेतकºयांना कर्ज वाटप करण्याचे नियोजन करावे लागणार आहे़ जिल्ह्यातील सहकारी, राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे़ उद्दिष्टानुसार बँका कशा पद्धतीने पीक कर्जाचे वाटप करतात, त्यावरच शेतकºयांचा रबी हंगाम अवलंबून राहणार आहे़ त्यामुळे रबी हंगाम सुरू होण्यापूर्वीच बँकांनी गरजू शेतकºयांना पीक कर्ज वाटप करावे, अशी मागणी होत आहे़
खरिपात ३० हजार नवीन कर्जदार
यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये पीक कर्ज वाटप करीत असताना जिल्ह्यातील बँकांनी ३० हजार ११३ नवीन कर्जदार शेतकºयांना २३२ कोटी २३ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे़ त्यामध्ये व्यापारी बँकांनी १४ हजार ७५४ शेतकºयांना १२३ कोटी ९२ लाख तर ग्रामीण बँकेने १५ हजार ३५९ शेतकºयांना १०८ कोटी ३१ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे़
कर्जमाफी झालेल्या ३० हजार शेतकºयांना लाभ
मागील वर्षी राज्य शासनाने राज्यातील शेतकºयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना राबविली़ या योजनेमध्ये १ लाख ३४ हजार २४२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे़ कर्जमाफीचा लाभ झाल्यानंतर यावर्षीच्या खरीप हंगामात ३० हजार ९९२ शेतकºयांना परत १ कोटी १४ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे़ विशेष म्हणजे, कर्जमाफीचा लाभ झालेल्या शेतकºयांपैकी एकाही शेतकºयाने व्यापारी बँकेकडून नवीन कर्ज घेतलेले नाही़
खरिपाचेच : उद्दिष्ट रखडलेले
जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामामध्ये सर्वाधिक पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते़ मात्र पीक कर्ज वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतला़ खरीप हंगाम संपून रबी हंगामाची तयारी होत असताना बँकांनी मात्र केवळ २७ टक्के शेतकºयांनाच कर्ज वाटप केले आहे़ त्यामुळे या शेतकºयांना खरिपाचेच कर्ज कधी मिळेल, अशी चिंता असून, हे कर्ज उचलल्यानंतर रबी हंगामासाठीच्या कर्जाचा विचार होणार आहे़ त्यामुळे बँकांनी कर्ज वाटपाच्या कामाला गती द्यावी, अशी शेतकºयांची मागणी आहे़
व्यापारी बँकांना सर्वाधिक उद्दिष्ट
२०१८-१९ च्या रबी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे़ त्यात व्यापारी बँकांना सर्वाधिक उद्दिष्ट दिले आहे़ जिल्ह्यातील व्यापारी बँकांना २०७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपयांचे कर्ज वाटप करावयाचे आहे़ तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७४ कोटी ५३ लाख ८६ हजार रुपये आणि ग्रामीण बँकेला ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ या बँका दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करतात की नाही, यावरच शेतकºयांचा रबी हंगाम अवलंबून राहणार आहे़

Web Title: Parbhani: Objective of 313 crores for Rabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.