परभणी : मानवतमध्ये भाजपचे सखाहरी पाटील यांचा एकतर्फी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:07 AM2019-06-25T00:07:15+5:302019-06-25T00:08:23+5:30

येथील नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सखाहरी पाटील हे तब्बल ९ हजार ४३९ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या पूजा खरात यांचा दणदणीत पराभव केला आहे़

Parbhani: One-sided victory of BJP's Sakhhari Patil in Manavat | परभणी : मानवतमध्ये भाजपचे सखाहरी पाटील यांचा एकतर्फी विजय

परभणी : मानवतमध्ये भाजपचे सखाहरी पाटील यांचा एकतर्फी विजय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): येथील नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सखाहरी पाटील हे तब्बल ९ हजार ४३९ मतांनी विजयी झाले असून, त्यांनी काँग्रेसच्या पूजा खरात यांचा दणदणीत पराभव केला आहे़
मानवत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार सखाहरी पाटील, काँग्रेसच्या पूजा खरात आणि अपक्ष रतन वडमारे अशी तिरंगी निवडणूक झाली होती़ या निवडणुकीचा निकाल सोमवारी सकाळी १०़३० वाजता जाहीर झाला़ त्यामध्ये भाजपाचे सखाहरी पाटील यांना १२ हजार २१० तर काँग्रेसच्या पूजा खरात यांना २ हजार ७७१ मते मिळाली़ अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांना २७३ आणि नोटाला १४३ मते मिळाली़ भाजपाच्या पाटील यांनी काँग्रेसच्या खरात यांचा तब्बल ९ हजार ४३९ मतांनी पराभव केला़ निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हा निकाल जाहीर केला़ त्यानंतर भाजपाच्या वतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी आ़ मोहन फड, डॉ़ अंकुश लाड, विजयी उमेदवार प्रा़ सखाहरी पाटील, गंगाधर कदम, नगरसेवक बाबूराव हलनोर, गिरीष कत्रूवार, गणेश कुमावत, बालाजी कुºहाडे, प्रभाकर वाघीकर, दत्ता चौधरी, शिवसेनेचे शहर प्रमुख बालाजी दहे, मोहन लाड, गणेश कुमावत, राजू खरात, मुंजाभाऊ तरटे, किरण बारहाते आदींची उपस्थिती होती़
परभणी मनपाच्या पोटनिवडणुकीत गवळणबाई रोडे, अब्दुल फातेमा विजयी
परभणी : येथील महापालिकेच्या सदस्य पदाच्या दोन जागांसाठी सोमवारी मतमोजणी झाली़ त्यात प्रभाग ३ ड मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रोडे तर प्रभाग ११ अ मधून एमआयएमच्या उमेदवार अब्दुल फातेमा अ़ जावेद विजयी झाल्या आहेत़
महापालिकेच्या एका सदस्याचे निधन झाल्याने तर दुसऱ्याच्या सदस्याचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने दोन रिक्त पदांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती़ प्रभाग क्रमांक ११ अ मध्ये चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ त्यात एआयएमआयएमच्या उमेदवार अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांना ३ हजार ७३४ मते पडले असून, त्यांचे प्रतीस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे अ‍ॅड़ सय्यद जावेद कादर सय्यद अब्दुल कादर यांना १ हजार ५९७ मते मिळाली़ २ हजार १३७ मतांनी अब्दुल फातेमा अ़ जावेद विजयी झाल्या आहेत़ प्रभाग क्रमांक ३ ड मध्ये एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़ या प्रभागातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार गवळण रामचंद्र रोडे यांना ३ हजार ६८ मते मिळाली असून, अपक्ष उमेदवार अलीमोद्दीन इमामोद्दीन यांना १ हजार ३४९ मते मिळाली़ तर अन्य एक अपक्ष उमेदवार फेरोज खान कलंदर खान यांना १ हजार २६५ मते मिळाली आहेत़ या प्रभागात राकाँच्या गवळण रोडे या १ हजार ७१९ मतांनी विजयी झाल्या आहेत़
शहरातील कल्याण मंडपम् परिसरात सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाली़ दुपारी साधारणत: १ वाजेच्या सुमारास सर्व निकाल हाती आले़ निकालानंतर विजयी उमेदवारांचे त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करीत स्वागत केले़
एमआयएमची पहिल्यांदाच मनपात एंट्री
४एमआयएम व वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच यावेळी दोन्ही जागांवर निवडणूक लढविण्यात आली़ त्यातील प्रभाग क्रमांक ११ मध्ये एमआयएमला यश मिळाले़ या माध्यमातून पहिल्यांदाच महानगरपालिकेत एमआयएमने एंट्री केली आहे़ लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य पाहता व मनपा पोट निवडणुकीतील निकाल लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम- वंचित बहुजन आघाडीकडे इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़
काँग्रेससाठी सोमवार ठरला निराशाजनक दिवस
४सोमवारी मतमोजणी झाली़ या मतमोजणी अंती हा दिवस काँग्रेससाठी निराशाजनकच ठरल्याचे दिसून आले़ परभणी महानगरपालिकेतील काँग्रेसच्या ताब्यातील जागा एमआयएमकडे गेली तर तिकडे मानवत नगरपालिकेत काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला़ सोनपेठमध्येही काँग्रेसला थारा मिळाला नाही़ त्यामुळे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्यासाठी हा चिंतनाचा दिवस ठरला आहे़

Web Title: Parbhani: One-sided victory of BJP's Sakhhari Patil in Manavat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.