परभणी : कांदा उत्पादनाला दुष्काळाच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:48 AM2019-04-22T00:48:20+5:302019-04-22T00:48:52+5:30
तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढली आहे़ इतर पिकांबरोबरच बागायती पिकांतील कांदा पिकाच्या उत्पादनाला यावर्षी दुष्काळाचा चांगलाच फटका बसला आहे़ त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत़
पालम तालुक्यात गोदावरी नदीच्या पट्ट्यातील आरखेड, सोमेश्वर व उमरथडीच्या शिवारात दरवर्षी रबी हंगामात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल जाते़ आरखेड गाव तर मागील तीन वर्षांपासून कांदा उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपाला आले आहे़ विशेष म्हणजे मागील वर्षी २०० एकरवर कांदा पीक घेण्यात आले होते़
यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले होते़ त्यामुळे दिवसेंदिवस कांद्याच्या लागवडीमध्ये मोठी वाढ होत होती़ परंतु, यावर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांची गणिते बिघडून गेली आहेत़ कांदा पिकासाठी शेतकºयांनी बी-बियाणे, रासायनिक खते, औषधांवर हजारो रुपये खर्च केले़ परंतु, या पिकातून शेतकºयांना उत्पन्न कमी मिळाल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला़
कांदा पिकाला भरपूर पाणी लागत असल्याने यावर्षी पाण्याचा ताण पडला आहे़ त्यामुळे पिकासाठी वेळेवर पाणी उपलब्ध झाले नाही़ त्यामुळे कांद्याची वाढ कमी होवून कांद्याचा आकार हा लहान राहिला आहे़ यामुळे कांद्याला बाजारपेठेत मागणी नाही़ त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी हे आर्थिक कोंडीत सापडले आहेत़
सरसकट मदत देण्याची मागणी
दरवर्षी पालम तालुक्यात इतर फळपिकांबरोबरच कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते़ कांदा उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपाला आलेल्या आरखेड व परिसरातील कांदा उत्पादकांची मदार ही डिग्रस बंधाºयातील पाण्यावर होती़; परंतु, प्रशासनाने तालुक्यातील एकाही शेतकºयाच्या सिंचन व ग्रामस्थांच्या पाण्याचा विचार न करता काही महिन्यांपूर्वी डिग्रस बंधाºयातील संपूर्ण पाणी नांदेडसाठी सोडून दिले़ त्यामुळे आधीच दुष्काळाचा सामना करणाºया या कांदा उत्पादक शेतकºयांना डिग्रसमधील सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पर्यायच उपलब्ध राहिला नाही़ परिणामी शेतकºयांना आपल्या पिकांवर पाणी फेरावे लागले़ कृषी विभाग व राज्य शासनाने कांदा उत्पादकांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे़