परभणी : ४०० तूर उत्पादकांची आॅनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:07 AM2019-02-13T01:07:10+5:302019-02-13T01:08:06+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामातील तूर हा शेतमाल खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या केंद्रांवर १२ फेब्रुवारीपर्यंत ४०० तूर उत्पादकांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामातील तूर हा शेतमाल खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने ५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या केंद्रांवर १२ फेब्रुवारीपर्यंत ४०० तूर उत्पादकांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
यावर्षी जून व जुलै या दोन महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. या पावसाच्या पाण्यावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. यामध्ये नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस, सोयाबीन, मूग, उडीद व तूर पिकाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता; परंतु, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर या तीन महिन्यात जिल्ह्यात पाऊस झाला नाही. परिणामी पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके जाग्यावरच करपून गेली. ज्या शेतकºयांकडे थोेड्याफार प्रमाणात पाणी उपलब्ध होेते, त्या शेतकºयांनी पिकातून उत्पन्न घेतले; परंतु, शेतकºयांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर खाजगी व्यापाºयांनी कवडीमोल दराने या शेतमालाची खरेदी केली. दुष्काळाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी व्यापाºयांच्या आडमुठ्या धोरणामुळे आर्थिक कोंडीत सापडला. शेतकºयांची परिस्थिती पाहून राज्य शासनाने जिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करून शेतकºयांकडून सोयाबीन, मूग, उडिदाची हमीभाव दराने खरेदी केली. त्यामुळे शेतकºयांना थोडाफार दिलासा मिळाला. सध्या खरीप हंगामातील तूर हा शेतमाल सध्या बाजारपेठेत येत आहे. राज्य शासनाने तूर या पिकाला ५ हजार ६७५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे; परंतु, खाजगी बाजारपेठेत ५ हजार रुपयांपेक्षा वर तुरीची खरेदी करण्यात येत नाही. त्यामुळे तूर उत्पादक कोंडीत सापडले आहेत. तूर उत्पादकांची समस्या लक्षात घेऊन ५ फेब्रुवारीपासून राज्य शासनाने जिल्ह्यातील परभणी, सेलू, पूर्णा, पालम, पाथरी व जिंतूर या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले आहेत. या केंद्रांवर २३ फेब्रुवारीपर्यंत तूर उत्पादक शेतकºयांना आॅनलाईन नोंदणी करता येणार आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत ४०० तूर उत्पादक शेतकºयांनी शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे.
पूर्णा, सेलू केंद्रावर होईना नोंदणी
जिल्ह्यात सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सहा केंद्रावर ४०० तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी केली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील ३१४ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्याच बरोबर पालम ६०, पाथरी १४, जिंतूर ११ तर पूर्णा व सेलू या दोन हमीभाव खरेदी केंद्रावर अद्यापपर्यंत एकही आॅनलाईन नोंदणी झालेली नाही. नोंदणीसाठी २३ फेबु्रवारी ही शेवटची मुदत असल्याने केवळ नोंदणीसाठी ११ दिवसच उरले आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकºयांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी केले आहे.
गतवर्षी ७९ हजार क्विंटल तुरीची खरेदी
४गतवर्षी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांना चांगले उत्पादन मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील तूर या शेतमालाची खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले होते. या केंद्रांवर राज्य शासनाने दिलेल्या मुदतीत १७ हजार तूर उत्पादकांनी ८९ हजार क्विंटल तुरीची विक्री केली होती;परंतु, यावर्षी जिल्ह्यात पाऊस न झाल्याने तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे केवळ ४०० तूर उत्पादकांनीच नोंदणी केली आहे. यातून जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता दिसून येत आहे.