परभणी: आठवड्यात केवळ ७० क्विंटल मुगाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:33 AM2018-10-30T00:33:29+5:302018-10-30T00:34:21+5:30

येथील एमआयडीसी परिसरात दी विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या वतीने २०१८-१९ हंगामातील मूग, उडीद खरेदी करण्यासाठी मागील आठवड्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय हमीभाव मूग खरेदी केंद्रावर केवळ ४२ शेतकऱ्यांजवळील ६९.७० क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र प्रशासनाच्या संथगती कारभारामुळे शेतकºयांना याचा मोठा फटका बसत आहे.

Parbhani: Only 70 quintals of Mugha can be bought in the week | परभणी: आठवड्यात केवळ ७० क्विंटल मुगाची खरेदी

परभणी: आठवड्यात केवळ ७० क्विंटल मुगाची खरेदी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : येथील एमआयडीसी परिसरात दी विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या वतीने २०१८-१९ हंगामातील मूग, उडीद खरेदी करण्यासाठी मागील आठवड्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय हमीभाव मूग खरेदी केंद्रावर केवळ ४२ शेतकऱ्यांजवळील ६९.७० क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. केंद्र प्रशासनाच्या संथगती कारभारामुळे शेतकºयांना याचा मोठा फटका बसत आहे.
शहरातील एमआयडीसी परिसरात तालुका खरेदी विक्री संघाने भाडेतत्वावर घेतलेल्या खाजगी गोडाऊनमध्ये २३ आॅक्टोबर रोजी खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब निरस, जिल्हा मार्केटिंग अधिकारी भागवत शेवाळे, वसंत चोरघडे, बंडू सोळंके, लक्ष्मण भोसले, बाबासाहेब भोसले यांच्या उपस्थितीत शासकीय हमीभाव मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील मूग व उडीद उत्पादक शेतकºयांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हमीभाव मिळवून शेतमालाचे चांगले पैसे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. शासकीय हमीभाव खरेदी केंद्राच्या संथगतीच्या कारभारामुळे २३ आॅक्टोबर रोजी पहिल्या तीन शेतकºयांचा साडेतीन क्विंटल, २४ रोजी २ शेतकºयांचा ४ क्विंटल, २५ रोजी सर्वाधिक ३६ शेतकºयांचा ६१ क्विंटल २० किलो मूग खरेदी करण्यात आला. विशेष म्हणजे २६ आॅक्टोबर रोजी दिवसभरात एका शेतकºयाजवळील एका क्विंटल मूगाची खरेदी करण्यात आली.
मागील आठवड्यात चार दिवस सुरू असलेल्या मूग, उडीद केंद्रावर ४२ शेतकºयांचा केवळ ६९ क्विंंटल ७० किलो मूग खरेदी करण्यात आला. शासनाने जिल्हा निहाय प्रती हेक्टरी मूग, उडीद उत्पादकतेची यादी जाहीर केली आहे. शासकीय हमीभाव योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यात हेक्टरी केवळ १ क्विंटल ८० किलो एवढे मूग खरेदी करण्याची अट घातली आहे.
त्यामुळे शेतकºयांकडे निर्माण झालेली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी नाविलाजास्तव आपल्या जवळील मूग शासकीय हमीभाव ६ हजार ९७५ ऐवजी खुल्या बाजार ३ हजार रुपयांपासून साडेचार हजार रुपये क्विटंल प्रमाणे पडेल भावात विक्री करावा लागत आहे. हेक्टरी किमान पाच क्विंटल मूग खरेदी करावा, अशी मागणी या परिसरातील शेतकºयांमधून केली जात आहे.
सोयाबीन : खरेदीबाबत सूचना नाही
४गंगाखेड तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकºयांजवळील सोयाबीन शासकीय हमीभाव दरात खरेदी करण्यासाठी तालुका खरेदी विक्री संघाकडून आॅनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
४आतापर्यंत या संघाकडे सव्वाचारशे शेतकºयांनी आॅफलाईन नावे दिली आहेत. यातील १०० च्या जवळपास शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्याचे काम पूर्र्ण झाले आहे. मात्र सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत आतापर्यंत शासनाकडून कुठल्याही सूचना प्राप्त झाल्या नाहीत.
४ त्यामुळे गंगाखेड, सोनपेठ तालुक्यातील सोयाबीन खरेदी अंधांतरी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे ३ हजार ४९९ रुपये हमीभाव असलेले सोयाबीन खुल्या बाजारातील आडत व्यापाºयांकडून २७०० रुपयांपासून ३१८० रुपयांपर्यंत मनमानी दराने खरेदी केले जात आहे. याचा शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
गतवर्षी खरेदी केलेल्या तुरीचे पैसे थकले
गंगाखेड तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांकडून गतवर्षीच्या हंगामात शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या तुरीचे ६ लाख ७० हजार ३५० रुपये शासनाकडे थकीत आहेत. महाराष्टÑ फेडरेशन पणन महासंघाकडे तालुक्यातील ७ तूर उत्पादक शेतकºयांच्या तुरीचे पैसे थकल्याने तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने महाराष्टÑ फेडरेशन व जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. यावर अद्यापपर्यंत कुठलीच कार्यवाही झाली नाही. तसेच २०१६-१७ व २०१७-१८ या हंगामात महाराष्टÑ फेडरेशन पणन महासंघासाठी तालुका खरेदी विक्री संघाने खरेदी केलेल्या तूर, हरभरा आदी धान्याचे २५ लाख रुपये कमिशन थकीत राहिल्याचे व्यवस्थापक बाबासाहेब भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Parbhani: Only 70 quintals of Mugha can be bought in the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.