परभणी : जाहीर प्रचारासाठी उरले केवळ पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:14 AM2019-10-15T00:14:16+5:302019-10-15T00:14:34+5:30

विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे प्रचार करण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक राहिले असून, या कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने उमेदवारांनी प्रचाराची राळ उडविली आहे़

Parbhani: Only five days left for publicity campaign | परभणी : जाहीर प्रचारासाठी उरले केवळ पाच दिवस

परभणी : जाहीर प्रचारासाठी उरले केवळ पाच दिवस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विधानसभा निवडणुकीत उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे प्रचार करण्यासाठी केवळ ५ दिवस शिल्लक राहिले असून, या कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने उमेदवारांनी प्रचाराची राळ उडविली आहे़
परभणी जिल्ह्यात परभणीसह गंगाखेड, सेलू-जिंतूर आणि पाथरी या चार विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे़ २१ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला़ सुरुवातीच्या काळात संथगतीने होत असलेला हा प्रचार उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापासून गती घेवू लागला़ प्रचारसभा, प्रचार रॅली, मतदारांच्या गाठीभेटी आणि ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार सुरू झाला आहे़
परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे़ या मतदार संघात परभणी शहर आणि परिसरातील ५३ गावांचा समावेश आहे़ शहरी भागात उमेदवार व कार्यकर्त्यांनी प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे़ त्याचबरोबर ग्रामीण भागातही प्रचाराची यंत्रणा राबविली जात आहे़ प्रत्येक गावामध्ये त्या त्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांवर जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे़
शहरातील प्रभागांमध्येही कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटून दिली असून, घरोघरी फिरून कार्यकर्ते आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत़ पाथरी, गंगाखेड आणि जिंतूर या मतदार संघामध्येही प्रचार शिगेला पोहचला आहे़ उमेदवारांच्या प्रचार रॅल्या काढल्या जात असून, ध्वनीक्षेपकही शहरासह ग्रामीण भागात फिरविले जात आहेत़ त्यामुळे जिल्हाभरात निवडणुकीचे वातावरण तापत आहे़
यावेळच्या निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १४ दिवसांचा कालावधी मिळाला़ त्यामुळे कमी काळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे़ २१ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, त्यापूर्वी ४८ तास आधी प्रचार तोफा थंडावणार आहेत़ १९ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रचार थांबेल़
त्यामुळे उमेदवारांकडे आता केवळ ५ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, या काळात मतदारांशी संवाद साधण्यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेण्याबरोबरच कॉर्नर बैठका, विशिष्ट संघटनांच्या बैठका, स्टार प्रचारकांच्या प्रचारसभा आणि ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर दिला जात आहे़
सकाळी ६ वाजेपासूनच प्रचार
४प्रचारासाठी केवळ ५ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारांनी जास्तीत जास्त वेळ मतदार संघात दौरे करण्यासाठी नियोजित केला आहे़ त्यामुळे दररोज सकाळी ५ वाजेपासूनच उमेदवार घराबाहेर पडत असून, ग्रामीण भागासह शहरी भागात मतदारांशी संवाद साधला जात आहे़
४विशेष म्हणजे, रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू आहेत़ थेट प्रचाराबरोबरच सोशल मीडियाचाही आधार प्रचारासाठी घेतला जात आहे़ व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर या समाजमाध्यमातून उमेदवार मतदारांच्या संपर्कात राहत आहेत़ काही उमेदवारांनी बल्क मॅसेज ही सुविधा घेवून मतदारांशी संपर्क साधला आहे़
यादीनिहाय मतदारांशी संपर्क
४मतदान प्रक्रिया जवळ येऊन ठेपल्याने कार्यकर्त्यांनी आता मतदार यादीतून मतदारांची नावे शोधण्यास सुरुवात केली आहे़ मतदार यादीतील नावांचा शोध घेवून मतदारांशी संपर्क केला जात आहे़ बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना मतदानाची तारीख आणि मतदान केदं्राची माहिती दिली जात आहे़
केंद्र, राज्यस्तरावरील नेत्यांच्या सभा
४परभणी विधानसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचारासाठी केंद्र आणि राज्यस्तरावरील नेत्यांना पाचारण केले होते़
४आतापर्यंत जिंतूर विधानसभा मतदार संघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, परभणी विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे बॅ़ अससोद्दीन ओवीसी यांच्या सभा जिल्ह्यात झाल्या आहेत़
४येत्या पाच दिवसांत स्टार प्रचारकांच्या सभा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Parbhani: Only five days left for publicity campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.