परभणी : डिग्रस बंधाऱ्याचे गेट उघडून नांदेडला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:50 PM2019-08-26T23:50:19+5:302019-08-26T23:50:34+5:30
तालुक्यातील डिग्रस बंधाºयामध्ये २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जायकवाडीचे पाणी दाखल झाले आहे. हे पाणी दाखल होताच डिग्रस बंधाºयाचे एक गेट उघडून नांदेडसाठी पाणी सोडण्यात आले आहे. विष्णुपुरी धरण भरल्यानंतर डिग्रस दरवाजे बंद केले जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): तालुक्यातील डिग्रस बंधाºयामध्ये २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जायकवाडीचे पाणी दाखल झाले आहे. हे पाणी दाखल होताच डिग्रस बंधाºयाचे एक गेट उघडून नांदेडसाठी पाणी सोडण्यात आले आहे. विष्णुपुरी धरण भरल्यानंतर डिग्रस दरवाजे बंद केले जाणार आहेत.
जोरदार पाऊस न पडल्याने पालम तालुक्याच्या हद्दीत गोदावरीचे पात्र पूर्णत: कोरडे होते. त्यामुळे डिग्रसचा बंधारा आजपर्यंत कोरडाच होता. जायकवाडीचे पाणी या बंधाºयात दाखल झाले आहे. त्यामुळे गोदावरीचे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. शासनाच्या आदेशानुसार डिग्रस बंधाºयात पाणी आताच न अडविता विष्णूपुरीसाठी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे २६ आॅगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गेट क्रमांक १३ उघडून २२०० क्युसेक वेगाने पाणी विष्णूपुरीसाठी सोडले जात आहे. हे पाणी नांदेडकडे झेपावले आहे.
४विष्णुपुरीच्या बंधाºयात २५ टक्के पाणीसाठा झाल्यानंतर डिग्रस बंधाºयाचे गेट बंद केले जाणार आहेत. त्यानंतर डिग्रस बंधारा २५ टक्के भरून घेतला जाणार आहे. सध्या तरी जायकवाडीचे पाणी वेगाने नांदेडकडे जात आहे.
४या पाण्यामुळे गोदावरीचे पात्र तुडुंब भरून वाहत असून सोडलेले पाणी केवळ पिण्यासाठी सोडण्यात आल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून देण्यात आली आहे. हे पाणी डिग्रस बंधाºयात दाखल झाले असले तरी सुरुवातीला नांदेड येथील विष्णू प्रकल्पात पाणीसाठा केला जाणार आहे.