परभणी :कारवाई बेकायदेशीर असल्याचे नोंदविले मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:34 AM2017-12-03T00:34:46+5:302017-12-03T00:34:51+5:30
जुन्या एजन्सीने केलेले करनिर्धारण चुकीचे ठरवत शासनाने जुन्या एजन्सीसह स्थानिक संस्था कर रद्द ठरविल्यानंतरही परभणी महापालिकेने जुन्याच करावर अधारित व्यापाºयांना नोटिसा देऊन त्यांच्याविरुद्ध केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे मत येथील व्यापाºयांनी विभागीय अप्पर आयुक्त विजयकुमार फड यांच्याकडे शनिवारी नोंदविले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जुन्या एजन्सीने केलेले करनिर्धारण चुकीचे ठरवत शासनाने जुन्या एजन्सीसह स्थानिक संस्था कर रद्द ठरविल्यानंतरही परभणी महापालिकेने जुन्याच करावर अधारित व्यापाºयांना नोटिसा देऊन त्यांच्याविरुद्ध केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे मत येथील व्यापाºयांनी विभागीय अप्पर आयुक्त विजयकुमार फड यांच्याकडे शनिवारी नोंदविले.
स्थानिक संस्था कराच्या (एल.बी.टी.) थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेने व्यापाºयांना नोटिसा देऊन दुकान सील करणे, बँक खाते गोठवणे अशी कारवाई केली. याविरुद्ध परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने शासनाकडे तक्रार नोंदविली होती. या तक्रारीची दखल घेत वस्तूस्थिती काय आहे, याचा अहवाल सादर करण्याचे शासनाने विभागीय आयुक्तांना दिले होते. या आदेशानुसार विभागीय अप्पर आयुक्त विजयकुमार फड आणि विभागीय उपसंचालक लता मेत्रेवाड २ डिसेंबर रोजी चौकशीसाठी परभणीत दाखल झाले होते. फड यांनी सुरुवातीला महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर व्यापाºयांची बाजू जाणून घेण्यासाठी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मनपा उपायुक्तांच्या कक्षात बैठक घेण्यात आली. त्यावेळी व्यापाºयांनी या कारवाईविषयीचा रोष फड यांच्यासमोर मांडला.
परभणी महापालिकेत झालेले करनिर्धारण चुकीच्या पद्धतीचे आहे. त्यामुळे येथील एजन्सी रद्द करून नव्या एजन्सीमार्फत कर निर्धार करावे आणि महापालिकेची थकबाकी वसूल करावी जेणे करून मनपाचे नुकसान होणार नाही, असे आदेश शासनाने दिले होते़ मात्र महापालिकेने जुन्याच एजन्सीने लावलेल्या करांवर आधारित थकबाकी वसुलीच्या नोटिसा बजावल्या़ त्यावरच कारवाई केली़ त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हणणे व्यापाºयांनी मांडले़
तसेच अनेक व्यापाºयांना मूळ कर कमी आणि दंड अधिक अशा नोटिसा दिल्या आहेत़ नवे असेसमेंट करण्यासाठी मुदतवाढ दिली असतानाही जुन्या करांवरच असेसमेंट केले जात आहे़ त्यामुळे हा सर्व प्रकार बेकायदेशीर असल्याचे मत व्यापाºयांनी नोंदविले आहे़ महापालिकेच्या कारवाईमुळे व्यापाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे़, असेही व्यापाºयांनी यावेळी सांगितले़
या वेळी माजी आ़ विजय गव्हाणे यांनीही मत मांडले़ या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते़