परभणी : ४६ कोटी रुपये देण्याचे २ कारखान्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:52 AM2019-05-07T00:52:45+5:302019-05-07T00:53:32+5:30
एफआरपीपोटी दोन साखर कारखान्यांकडे थकलेले ४६ कोटी ८३ लाख ४५ हजार रुपये १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यात यावे, असे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांनी सोमवारी काढले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एफआरपीपोटी दोन साखर कारखान्यांकडे थकलेले ४६ कोटी ८३ लाख ४५ हजार रुपये १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना देण्यात यावे, असे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांनी सोमवारी काढले आहेत. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात आंदोलन केल्यानंतर आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी गंगाखेड तालुक्यातील माखणी येथील गंगाखेड शुगर व पाथरी तालुक्यातील योगेश्वरी साखर कारखान्यास ऊस दिला होता. या कारखान्यांकडून सदरील शेतकºयांना एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाली नव्हती. चार महिन्यांपासून ही रक्कम मिळाली नसल्याने शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम, क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी नांदकिले, भाजपाचे जि.प.सदस्य सुभाष कदम आदींनी ६ मे रोजी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या पुणे येथील कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या त्यानुसार सोमवारी सकाळी या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन सुरु केले. त्यानंतर साखर आयुक्त गायकवाड यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
त्यानुसार त्यांनी याबाबतचे आदेश काढले. त्यामध्ये गंगाखेड शुगर साखर कारखान्याने २०१८-१९ च्या हंगामातील एफआरपीची ३२ कोटी १ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम व लिंबा येथील योगेश्वर शुगर लि.या कारखान्याने त्यांच्याकडील एफआरपीची १४ कोटी ८१ लाख ५० हजार रुपयांची रक्कम १५ टक्के देय होणारे व्याज या कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेल्या प्रथम प्राधान्याने नॉनप्लेज साखर, मोलॅसीस आणि बगॅस व तद्नंतर आवश्यकतेनुसार प्लेज साखर आदी उत्पादनाची विक्री करुन त्यामधून सदर रक्कम वसूल करण्यात यावी. आवश्यकतेप्रमाणे कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्ताऐवजामध्ये शासनाच्या नावाची नोंद करावी. तसेच सदर मालमत्तेची जप्ती करुन त्याची विहित पद्धतीने विक्री करुन या रकमेतून ऊस नियंत्रण आदेश तरतुदीनुसार देय बाकी रकमेची खात्री करुन संबंधितांना विलंबित कालावधीत १५ टक्के व्याजासह रक्कम देण्याची कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकाºयांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असेही या आदेशात गायकवाड यांनी नमूद केले आहे.
त्यामुळे या कारखान्यांकडे ज्या शेतकºयांची रक्कम थकली आहे, त्यांना त्यांची थकित रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पाच साखर कारखान्यांकडे रक्कम थकल्याची केली तक्रार
४एफआरपी रकमेसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने साखर आयुक्तांना शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. त्यामध्ये गंगाखेड शुगर, योगेश्वर शुगर, माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील एनएसएल शुगर्स, नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील कुंटूरकर शुगर्स अॅण्ड अॅग्रो लि. आणि हिंगोली जिल्ह्यातील पूर्णा साखर कारखाना युनिट १ या पाच साखर कारखान्यांची नावे देण्यात आली आहेत.
४या कारखान्यांकडे शेतकºयांची एफआरपीची रक्कम थकल्याचे नमूद केले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष माऊली कदम, शिवाजी नांदखिले, जि.प. सदस्य सुभाष कदम, माऊली जोगदंड, अण्णा जोगदंड, बाळासाहेब जाधव, विश्वनाथ जाधव, प्रकाश कदम, पांडुरंग कदम, किरण जाधव, अशोक कतारे, बालाजी पिसाळ, मुंजाभाऊ शिंदे आदींसह अनेक शेतकºयांच्या स्वाक्षºया आहेत.
गंगाखेडमध्ये झाली होती संघटनेची बैठक
४शेतकºयांना उसाची थकित एफआरपीची रक्कम मिळावी, यासाठी गेल्या आठवड्यात शेतकरी संघटनेच्या वतीने गंगाखेड येथे बैठकीचे आयोजन केले होते.
४यावेळी झालेल्या चर्चेत थकित रकमेसाठी पुणे येथे साखर आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.