परभणी : विद्यार्थ्यांच्या संच मान्यतेच्या नोंदी पडताळण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:30 AM2018-10-06T00:30:12+5:302018-10-06T00:31:10+5:30

जि़प़ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपलब्धतेनुसार संच मान्यतेच्या नोंदीची पडताळणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सर्व गट शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत़

Parbhani: The order for the officials to verify the admission of the set of students | परभणी : विद्यार्थ्यांच्या संच मान्यतेच्या नोंदी पडताळण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

परभणी : विद्यार्थ्यांच्या संच मान्यतेच्या नोंदी पडताळण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जि़प़ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपलब्धतेनुसार संच मान्यतेच्या नोंदीची पडताळणी करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सर्व गट शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत़
जि़प़ शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षातील पटसंख्या ३० सप्टेंबरला निश्चित केली जाते़ त्यानुसार शाळांनी संच मान्यतेबाबत सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या नोंदी करणे आवश्यक आहे़ सदरच्या नोंदी केंद्रस्तरावर व केंद्रस्तरावरून गटशिक्षणाधिकारी यांच्यास्तरावरुन प्राथमिक शिक्षणाधिकाºयांकडे अंतीम करण्यासाठी पाठविल्या जातात़ त्या अनुषंगाने केंद्र प्रमुख व गटशिक्षणाधिकाºयांनी संच मान्यतेच्या नोंदी शाळेतील उपलब्ध विद्यार्थ्यांनुसार आहेत की नाही, याची पडताळणी करावी, असे आदेश शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिले आहेत़ विद्यार्थी संख्येबाबत तक्रार असल्यास किंवा चुकीची संख्या नोंदविल्यास संबंधित शिक्षक किंवा मुख्याध्यापक किंवा गटशिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असाही इशारा या आदेशात गरुड यांनी दिला आहे़ या संदर्भात सादर करण्यात आलेल्या माहितीची पडताळणी रँडम पद्धतीने जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज हे अचानकपणे शाळांना भेटी देऊन करणार आहेत, असेही या आदेशात गरुड यांनी म्हटले आहे़

Web Title: Parbhani: The order for the officials to verify the admission of the set of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.