परभणी : कालव्याचे काम नव्याने करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:52 AM2019-09-16T00:52:06+5:302019-09-16T00:52:29+5:30
निम्न दुधना प्रकल्पातून निघालेल्या उजव्या कालव्याचे काम कुंभारी बाजार परिसरात निकृष्ट दर्जाचे झाले असून, आता हे काम नव्याने करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे़ या आदेशामुळे निकृष्ट कामावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले असून, या प्रकरणात कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र पाठीशी घातले जात असल्याचा आरोप लाभधारक शेतकरी करीत आहेत़
मारोती जुंबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : निम्न दुधना प्रकल्पातून निघालेल्या उजव्या कालव्याचे काम कुंभारी बाजार परिसरात निकृष्ट दर्जाचे झाले असून, आता हे काम नव्याने करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे़ या आदेशामुळे निकृष्ट कामावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले असून, या प्रकरणात कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र पाठीशी घातले जात असल्याचा आरोप लाभधारक शेतकरी करीत आहेत़
निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकºयांना सिंचनासाठी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मुख्य कालवे, चाºयांची कामे हाती घेण्यात आली़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निम्न दुधना प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री सिंचाई योजनेत केला असून, या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला; परंतु, प्रत्यक्षात हे काम योग्य दर्जाचे होत नसल्याने सिंचनाचा प्रश्न निर्माण होत आहे़ निम्न दुधना प्रकल्पातून निघालेल्या उजव्या कालव्याचे काम परभणी तालुक्यातील कुंभारी बाजार या गावापर्यंत पूर्ण झाले आहे़ ४८ किमीच्या या कालव्याच्या माध्यमातून हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याने शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते़ मात्र प्रत्यक्षात कालव्याचे काम नियमानुसार झाले नाही़ आराखड्यानुसार कामे न केल्याने काही महिन्यांतच कालव्याला जागोजागी तडे गेले आहेत़ प्रकल्पातून निघालेला हा मुख्य कालवा असून, या कालव्याच्या वितरिकेचे तर यापेक्षा वाईट परिस्थिती झाली आहे़ कालव्याचे काम करताना सिमेंट, दगडाचा कमी प्रमाणात वापर करण्यात आला़ हा कालवा कुंभारीपर्यंत पूर्ण झाला आहे़ काम पूर्ण झाल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी या कामाची पाहणी केली असता, काम निकृष्ट झाल्याचे अभियंत्यांच्याच लक्षात आले़ कालव्याला सिमेंट काँक्रीटीकरण करताना ४ इंच जाडीचा थर देणे अपेक्षित असताना केवळ २ इंचाचा थर दिल्याची बाब लक्षात आली़ त्यामुळे काही भागाचे काम नव्याने करण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत़ कालव्याचे काम नव्याने करण्याचे आदेश दिल्याने या कामात झालेला निष्काळजीपणाच एक प्रकारे समोर आला आहे़ हे काम नव्याने होत असले तरी ते निकृष्ट का झाले? काम करीत असताना संबंधित अधिकाºयांनी तपासणी केली नाही का? तपासणी केली असेल तर या अधिकाºयांचे दुर्लक्ष झाले का? हे प्रश्न निर्माण झाले असून, या अधिकाºयांवर प्रशासनाने काय कारवाई केली? याबाबत मात्र स्पष्टीकरण दिले जात नाही़ त्यामुळे निकृष्ट दर्जाचे झालेले कालव्याचे काम नव्याने होणार असले तरी या कामाच्या तपासणी दरम्यान, निष्काळजी करणाºया अधिकाºयांच्या चुकांवर मात्र पांघरून टाकले जात असल्याची भावना लाभधारकांमध्ये निर्माण होत आहे़ दरम्यान, कालव्याचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी काळजी घ्यावी. कामाची वेळोवेळी तपासणी करावी, अशी मागणी लाभधारकांतून होत आहे.
मुख्य कालव्यालाच जागोजागी तडे
४निम्न दूधना प्रकल्पाच्या मुख्य कालव्यालाच अनेक ठिकाणी तडे गेले आहेत़ कालव्याच्या बाजुने जाणाºया पक्क्या रस्त्यावर मुरुमाचा भराव टाकला नाही़ परिणामी जड वाहनांच्या वाहतुकीमुळे सिमेंट काँके्रटचे थर चक्क उखडून गेले आहेत़ विशेष म्हणजे, हे काम पूर्ण होवून साधारणत: दोन-तीन महिन्यांचाच कालावधी लोटला आहे़ मात्र अल्प काळातच या कालव्याची दुरवस्था झाली आहे़
४या कालव्यातून अजून एकदाही पाणी वाहिले नाही़ त्यापूर्वीच कालव्याची दुरवस्था झाली आहे़ सिमेंट काँके्रट केलेला थर अनेक ठिकाणी उखडला असून, काही भागात कालव्याला तडे गेले आहेत़ मुख्य कालव्याची अशी स्थिती असून उपवितरिका आणि लहान चाºयांची कामेही अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत़ त्यामुळे ज्या उद्देशाने कालव्याची निर्मिती झाली तो उद्देश सफल होते की नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे़
आदेश देऊनही काम ठप्पच
४प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम सध्या या भागात सुरू आहे़ विशेष म्हणजे कंत्राटदारांकडून पुढील काम केले जात आहे़ याच काळात निकृष्ट दर्जाच्या कामाचा प्रश्न उपस्थित झाल्याने हे काम नव्याने करण्याचे आदेश देण्यात आले़
४आदेश देवून साधारणत: एक महिन्याचा कालावधी लोटला आहे; परंतु, नव्याने कालवा बांधणीच्या कामाला अजूनही सुरुवात झाली नाही़
४पाटबंधारे विभागातील अधिकारीही या संदर्भात गांभिर्याने पाठपुरावा करीत नसल्याने कालव्याचे पुढील काम होत आहे; परंतु, दिलेल्या आदेशानुसार मात्र काम करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसत आहे़
उजव्या कालव्याचे काम ज्या ठिकाणी खराब झाले आहे असे दोन ते चार पॅनल काढून ते काम पुन्हा करावे, असे आदेश दिले आहेत़ कालव्याला कुठे तडे असतील तर शाखा अभियंत्यामार्फत पाहणी करून त्यानंतर निर्णय घेतला जाईल़ सध्या चिखलामुळे वाहने कालव्यापर्यंत पोहचत नाहीत़ पाऊस कमी झाल्यास कामाला सुरुवात होईल़
-प्रसाद लांब, अभियंता