परभणी : साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ रेणुकादेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:18 AM2018-10-15T00:18:01+5:302018-10-15T00:18:54+5:30

डोंगराळ भागात वसलेल्या राणीसावरगाव येथील रेणुका देवीचे मंदिर देवींच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाते़ त्यामुळे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते़

Parbhani: Out of three and a half pounds, Renuka Devi | परभणी : साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ रेणुकादेवी

परभणी : साडेतीन पिठांपैकी अर्धपीठ रेणुकादेवी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
राणीसावरगाव (परभणी) : डोंगराळ भागात वसलेल्या राणीसावरगाव येथील रेणुका देवीचे मंदिर देवींच्या साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाते़ त्यामुळे नवरात्रोत्सवात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते़
राणीसावरगाव येथे सुमारे ७०० वर्षापूर्वी बांधलेले देवीचे हेमाडपंथी मंदिर आहे़ विश्वस्त म्हणून गळाकाटू कुटूंबातील वंशज काम पाहतात़ यावर्षी १० आॅक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे़ गावातील प्रत्येक घरात घटस्थापना करून नऊ दिवस उपवास केले जातात़ माहूर व तुळजापूरच्या देवीचे ठाण म्हणून येथील रेणुका देवीची भक्तीभावे आराधना केली जाते़ माहूर, तुळजापूरला जाणारे भाविक आवर्जून राणीसावरगाव येथे येऊन दर्शन घेतात़ नवसाला पावणारी देवी अशी या देवीची अख्यायिका आहे़ नवरात्र उत्सव काळात लातूर, नांदेड, परभणी आणि शेजारील आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून भाविक राणीसावरगाव येथे दाखल होतात़ भाविकांची संख्या लक्षात घेता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला आहे़ श्री चुडामुनी महाराजांची पालखी अहमदपूर येथून राणीसावरगाव येथे येते़ या पालखी सोहळ्यात ३ ते ४ हजार भाविकांचा सहभाग असतो़ राणीसावरगाव येथे यावर्षी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ दररोज रात्री आरती होते़ श्रींच्या नावाने प्रसाद वाटप केला जातो़ आष्टमीला होमहवन केले जाते़ दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनात पालखी मिरवणूक काढली जाते़ सर्व गावकरी पालखी सोबत माळावरील मूळ पीठ असलेल्या देवी मंदिरात जमतात़ या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम होतो़
पोलिसांचा चोख बंदोबस्त
राणीसावरगाव येथे नवरात्रोत्सव काळात भाविकांची संख्या दररोज वाढत आहे़ गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोºया होण्याची शक्यता असते. तेव्हा पोलीस प्रशासनाने मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़ दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत असून, या ठिकाणीही पोलीस प्रशासन नजर ठेवून आहे़

Web Title: Parbhani: Out of three and a half pounds, Renuka Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.