परभणी : अभियानांतर्गत स्वच्छतेच्या कामांना दिली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:34 AM2019-11-18T00:34:10+5:302019-11-18T00:34:27+5:30
स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत स्वच्छता कामगार आणि खाजगी विनिदाधारक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत स्वच्छता कामगार आणि खाजगी विनिदाधारक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी या मोहिमेची सुरुवात करण्यापूर्वी स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. मुख्य रस्त्यावरील कचºयाची सफाई करा, रस्त्यावर पडलेले दगड, विटा उचलून बाजूला टाका, नाल्यांच्या सफाईचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. गांधी पार्क, शिवाजी चौक या भागात गर्दी आणि अतिक्रमणामुळे महिलांना तसेच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील इतर भागातही स्वच्छतेची कामे हाती घ्यावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या होत्या. या बैठकीनंतर शहरातील स्वच्छता कामगारांच्या हाताखाली २० ते २५ कर्मचारी आणि एका मुकादमाची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारपासून प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. वसमतरोड, जिंतूररोड आदी भागातील वसाहतीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच नाल्यांची सफाई केली जात आहे. गंगाखेड रोड, बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसर इ. ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.
डास निर्मूलनासाठी धूर फवारणी
४स्वच्छते बरोबरच शहरात तापीची साथ पसरल्याने डास निर्मूलनासाठीही महापालिकेने धूर फवारणी सुरु केली आहे. नागरिकांनी घरातील रांजण, साठविलेले पाणी झाकून ठेवावे, भंगार विक्रेत्यांनी टायर, जुन्या वस्तूंमध्ये पाणी साचले असल्यास ते रिकामे करावेत. शाळा महाविद्यालयातील शौचालयांना परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी केले आहे.
मोकाट जनावरांसाठी काढल्या निविदा
४शहरात स्वच्छता मोहीम सुरु करण्याबरोबरच मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. वसमत रोड आणि जिंतूर रोड या भागांत मोकाट जनावरांची संख्या मोठी असल्याने या जनावरांना पकडून गो शाळेत टाकण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकरच मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जाईल, असे सांगण्यात आले.