परभणी : प्रवासी दादऱ्याच्या कामाला मिळेना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:53 PM2020-01-01T23:53:28+5:302020-01-01T23:53:58+5:30
येथील रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने नव्याने बांधण्यात येत असलेल्या रुंद दादºयाचे काम संथगतीने सुरू असून या कामाला गती देवून ते त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची गैरसोय कमी करण्याच्या उद्देशाने नव्याने बांधण्यात येत असलेल्या रुंद दादºयाचे काम संथगतीने सुरू असून या कामाला गती देवून ते त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़
दोन वर्षापूर्वी मुंबई येथे अरुंद दादºयावरून रेल्वेस्थानकाच्या बाहेर पडत असताना चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या स्थानकावरील दादऱ्यांची रुंदी वाढविण्याचा निर्णय घेतला़ दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येणारे परभणी हे आदर्श रेल्वेस्थानक आहे़ दररोज सुमारे ८० रेल्वे गाड्यांची या मार्गावरून वर्दळ आहे़ दिवसभरात शेकडो प्रवासी परभणी स्थानकावरून प्रवास करतात़ मात्र या स्थानकावर असलेला दादरा अरुंद आहे़ अधिक रुंदीचा दादराही या रेल्वेस्थानकावर असला तरी तो प्रवेशद्वारापासून दूर अंतरावर आहे़ परिणामी अरुंद दादºयाचाच सर्वाधिक वापर होतो़ त्यामुळे या दादºयावर अनुचित प्रकार घडू नये, या उद्देशाने नवीन दादरा उभारणीच्या कामाला मंजुरी मिळाली़ साधारणत: सहा महिन्यांपूर्वी कामाला प्रारंभही झाला़ रेल्वेस्थानकावरील विद्यापीठ गेटच्या बाजुने दादरा उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे़ सुरुवातीच्या काळात या कामाला बºयापैकी गती होती़ त्यामुळे निश्चित केलेल्या मुदतीत दादºयाचे काम पूर्ण होईल, अशी प्रवाशांना अपेक्षा होती़ मात्र कालांतराने या कामाची गती मंदावली़ सद्यस्थितीला चार दिवसांपासून हे बंद झाले आहे़ या गतीने जर दादºयाचे काम होत असेल तर मुदतीत पूर्ण होईल का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ वाढलेली प्रवासी संख्या लक्षात घेता दादºयाच्या कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे़ दररोज हजारो प्रवासी अरुंद दादºयाचा दाटीवाटीने वापर करतात़ रेल्वे गाडी स्थानकावर आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या दिशेने येण्यासाठी प्रवाशांना अर्धा-अर्धा तास ताटकळत थांबावे लागत आहे़ ही गैरसोय दूर करण्यासाठी नवीन दादºयाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़
दुहेरीकरणानंतर दादºयाचा वापर वाढला
४परभणी रेल्वेस्थानकावरून नांदेडकडे जाणाºया प्रवाशांच्या तुलनेत मनमाड, मुंबई, औरंगाबादकडे जाणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे़ या स्थानकावर तीन प्लॅटफॉर्म आहेत़ मिरखेल ते परभणी या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर तीनही प्लॅटफॉर्मचा पूर्ण क्षमतेने वापर केला जात आहे़ मनमाडच्या दिशेने जाणाºया रेल्वे गाड्या कायमस्वरुपी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर थांबविल्या जातात़ तर नांदेडकडे जाणाºया रेल्वे गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर थांबवितात़ त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक ३ चा वापर वाढला आहे़ मात्र प्रवाशांना त्यासाठी जुन्याच दादºयाचा सहारा घ्यावा लागतो़ हा दादरा ३़५ मीटर रुंदीचा असून, तो प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरत आहे़ त्यामुळे नवीन दादरा हा साडेपाच मीटर रुंदीचा तयार केला जात आहे़ प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नवीन दादºयाचे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे़
थेट स्थानकाबाहेर पडण्याची सुविधा
येथील रेल्वेस्थानकावर नव्याने तयार करण्यात येणारा दादरा प्रवाशांसाठी निश्चित सोयीचा होणार आहे़ या दादºयावरून प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि रेल्वेस्थानकाच्या पलीकडील बाजुस जाण्याची सुविधा करण्यात आली आहे़
विशेष म्हणजे, रेल्वे गाडीने आलेल्या प्रवाशांना मुख्य प्रवेशद्वाराचा वापर न करता थेट स्थानकाच्या बाहेर पडण्याची सुविधाही केली जात आहे़ त्यामुळे हा दादरा प्रवाशांसाठी सोयीचा ठरणार असून, अनेक वृद्ध प्रवासी तसेच महिला प्रवाशांची सद्यस्थितीला होत असलेली गैरसोय दूर होणार आहे़
सरकता जीना, लिफ्ट गैरसोयीची
रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सुविधेसाठी काही महिन्यांपूर्वी सरकता जीना आणि लिफ्टची सुविधा निर्माण करून देण्यात आली़ स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दूर अंतरावर या दोन्ही सुविधा आहेत़ प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर सरकता जीना बसविला असून, प्लॅटफॉर्म क्रमांक २ व ३ च्या मध्यभागी लिफ्ट बसविली आहे़ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठी या सुविधा फायद्याच्या ठरतील, असे वाटत होते़ मात्र या सुविधा गैरसोयीच्या झाल्या आहेत़
मनमाडकडून रेल्वेगाडी आल्यानंतर ती स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मधोमध उभी केली जाते़ त्यामुळे शेवटच्या डब्यामध्ये बसणाºया मोजक्याच प्रवाशांना ही सुविधा सोयीची ठरत आहे़ मात्र इतर प्रवाशांना बरेच अंतर पार करून लिफ्ट, सरकत्या जीन्याचा वापर करावा लागतो़ त्यामुळे हा सरकता जीना प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरत आहे़