परभणी पंचायत समितीला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:15 AM2018-01-25T00:15:31+5:302018-01-25T00:15:48+5:30
पंचायत समितीत रमाई आवास योजनेंतर्गत ७६ गावांतून आलेले १ हजार ६०० प्रस्तात धूळखात पडून आहेत़ हे प्रस्ताव तत्काळ समाजकल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीेन बुधवारी पं़स़ला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पंचायत समितीत रमाई आवास योजनेंतर्गत ७६ गावांतून आलेले १ हजार ६०० प्रस्तात धूळखात पडून आहेत़ हे प्रस्ताव तत्काळ समाजकल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीेन बुधवारी पं़स़ला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले.
परभणी पं़स़ अंतर्गत रमाई घरकूल योजनेंतर्गत ११०० घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते़ त्यानुसार लाभार्थ्यांकडून प्रस्तावही मागविण्यात आले़ लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालयात तब्बल १ हजार ६०० प्रस्ताव दाखल केले़ हे प्रस्ताव पं़स़ने समाजकल्याण कार्यालयाकडे तत्काळ पाठविणे आवश्यक होते़ परंतु, यावर कोणताच निर्णय घेण्यात आला नाही़ त्यामुळे संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली २४ जानेवारी रोजी परभणी पं़स़ला कुलूप ठोकले़ त्यानंतर गटविकास अधिकारी एम़व्ही़ करडखेलकर यांना घेराव घालण्यात आला़ त्यानंतर बीडीओ करडखेलकर यांनी सदरील प्रस्तावांची छाननी करण्याचे काम तात्काळ १० कर्मचाºयांकडे सोपविले. हे प्रस्ताव दोन दिवसांत समाजकल्याण विभागाकडे पाठविण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़ या आंदोलनात सिद्धार्थ कसारे, अरुण लहाने, किरण घोंगडे, आशिष वाकोडे, महेंद्र गाडेकर, संदीप कांबळे, निलेश डुमणे, सचिन खरात, सुभाष खिल्लारे, चंद्रकांत बनसोडे, तुषार कांबळे, अक्षय डंबाळे, बबलू कांबळे, विशाल कांबळे, सागरबाई खिल्लारे, नंदाबाई लोखंडे, उज्ज्वलाबाई लोखंडे, रेखाबाई लोखंडे, नंदा आवचार आदींसह पदाधिकाºयांचा सहभाग होता़