परभणी : अडीच तास उशिराने धावली पंढरपूर रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:34 IST2018-11-19T00:33:19+5:302018-11-19T00:34:15+5:30
निजामाबाद-पंढरपूर ही सवारी रेल्वेगाडी रविवारी तब्बल अडीच तासाने परभणी स्थानकावर पोहचल्याने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली.

परभणी : अडीच तास उशिराने धावली पंढरपूर रेल्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : निजामाबाद-पंढरपूर ही सवारी रेल्वेगाडी रविवारी तब्बल अडीच तासाने परभणी स्थानकावर पोहचल्याने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली.
१९ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून या दिवशी पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीचा सोहळा साजरा केला जातो. यासाठी परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो भाविक पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. परभणी रेल्वेस्थानकावरुन पंढरपूला जाणाºया भाविकांची संख्या वाढली असल्याचे पहावयास मिळाली. कार्तिकी एकादशीनिमित्त विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने केली होती. या मागणीची दखल घेत एक विशेष गाडीही रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाली.
पंढरपूरला जाण्यासाठी नियोजित निजामाबाद-पंढरपूर ही रेल्वेगाडी असल्याने या रेल्वेगाडीचे नियोजन करीत जिल्हाभरातील अनेक भाविक परभणीच्या स्थानकावर दाखल झाले होते. दररोज ६.२० वाजता परभणी रेल्वेस्थानकावर येणारी ही रेल्वेगाडी रविवारी मात्र ८.३० वाजेपर्यंत स्थानकावर आली नाही. ८.४१ मिनिटांनी पंढरपूर गाडी स्थानकावर पोहचली. त्यामुळे पंढरपूरकडे जाणाºया भाविकांना तब्बल अडीच तास रेल्वेची प्रतीक्षा करीत स्थानकावर ताटकळत थांबावे लागले.
सायंकाळी ५ वाजेपासूनच स्थानकावर भाविकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. प्लॅट फॉर्म क्रमांक ३ वर रेल्वेची प्रतीक्षा करत थांबलेले अनेक भाविक पहावयास मिळाले. सायंकाळी ६ वाजेपासून भाविक चौकशी कक्षात पंढरपूरकडे जाणाºया गाडीची विचारणा करीत होते; परंतु, प्रत्येकवेळी ही गाडी उशिरा येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे भाविकांना अडीच तासांपर्यंत स्थानकावर ताटकळत थांबावे लागले.
रात्री ८.३० वाजेच्या सुमारास देवगिरी एक्सप्रेस, पूर्णा पॅसेंजर आणि त्यानंतर पंढरपूर गाडी स्थानकावर दाखल झाली. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली असल्याचे दिसून आले.