परभणी : बंगळुरू रेल्वे गाडीत प्रवाशाला लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:43 PM2019-04-08T23:43:42+5:302019-04-08T23:44:04+5:30
परभणी तालुक्यातील मिरखेल रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसमधून प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): परभणी तालुक्यातील मिरखेल रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसमधून प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन हिसकावून चोरट्याने पोबारा केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मिरखेल रेल्वेस्थानकावर क्रॉसिंगसाठी बंगळुरू एक्सप्रेस ही गाडी थांबली होती. या गाडीत नेहमीच प्रवाशांची संख्या कमी असते. याच गाडीत पूर्णा येथील सईदा बेगम मो. युसूफ व त्यांचा मुलगा मो. अबरार व अन्य काही प्रवासी प्रवास करीत होते. याच दरम्यान, एका चोरट्याने गाडी रेल्वेस्थानकावरून सुटताच समोर बसलेल्या सईदा बेगम व अन्य एका महिलेच्या गळ्यावर हात मारला. यामध्ये सईदा बेगम यांचे ३० ते ३५ हजार रुपये किंमतीचे गंठण आले. दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ तुटून गाडीतच पडली. तेव्हा चोरट्याने चालत्या गाडीतून उडी मारून पोबारा केला. प्रवासी महिलेने रेल्वे महामार्ग पोलीस चौकी येथे येऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.