परभणी : नऊ टक्क्यांनी घटली पीककर्ज वाटपाची गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:02 AM2019-10-08T00:02:59+5:302019-10-08T00:04:41+5:30
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी जिल्ह्यातील बँकांनी गतवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतला आहे. गतवर्षी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ३०.०५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यावर्षी मात्र केवळ २१.४६ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र यावर्षी जिल्ह्यातील बँकांनी गतवर्षीपेक्षा यावर्षी पीक कर्ज वाटप करताना आखडता हात घेतला आहे. गतवर्षी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ३०.०५ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यावर्षी मात्र केवळ २१.४६ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले.
जिल्ह्यात तीन वर्षापासून दुष्काळी सदृष्य परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप व रबी हंगामात उसणवारी करुन बी बियाणांची पेरणी केली; परंतु, अपुºया पावसाअभावी पिकांची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील तीनही वर्षात पिकांवर केलेला खर्च उत्पादनातून निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले. त्यामुळे २०१९-२० च्या खरीप हंगामात शेतकºयांना पेरणी करण्यासाठी व बी बियाणे खरेदीसाठी पैशाची गरज होती.
जिल्हा प्रशासनाने शेतकºयांची अवस्था लक्षात घेऊन जिल्ह्यासाठी खरीप हंगामात १४७० कोटी ४४ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे खरीप हंगाम सुरू होईपर्यंत प्रत्येक लाभार्थी शेतकºयांना पीक कर्ज मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती.
मात्र खरीप हंगाम संपत आला तरीही बँकांनी दिलेले पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही. ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये २१.४६ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. यामध्येही व्यवसायिक बँकांनी ११ हजार ४७६ शेतकºयांना १०४ कोटी १८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करून केवळ १०.१२ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याच बरोबर खाजगी बँकांनी २०६६ शेतकºयांना ३२ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज वाटप करीत ४२.६१ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. त्यानंतर महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ११ हजार ४५७ शेतकºयांना ७८ कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ३९.११ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३३ हजार २८७ शेतकºयांना १०१ कोटी ४ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ६१.६ टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट गाठले आहे. त्यामुळे खरीप हंगाम संपला तरीही अद्यापपर्यंत एकाही बँकेने पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही. विशेष म्हणजे गतवर्षीच्या खरीप हंगामात ३० सप्टेंबरपर्यंत ३०.५ टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र यावर्षी बँकांनी पीक कर्ज वाटप करताना केवळ २१.४६ टक्के पीक कर्ज वाटप केले आहे. यावर्षी ९ टक्क्यांनी पीक कर्ज वाटप करण्याची गती कमी झाल्याचे दिसून येत आहे.
रबीसाठी ३१३ कोटींचे उद्दिष्ट
च्रबी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी ३१३ कोटी ४७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. एकीकडे खरीप हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांनी पूर्ण केले नसतानाच दुसरीकडे रबी हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे बँकांना पीक कर्ज वाटप करताना आगामी काळात मोठी कसरत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
च्पीक कर्ज वाटप करताना बँकांकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचे कारण पुढे करून शेतकºयांना पीक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ करीत आहेत. त्यामुुळे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी याकडे लक्ष देऊन पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.
च्जिल्ह्यातील बँकांनी लाभार्थी शेतकºयांना वेळेत पीक कर्ज वाटप करण्यासाठी स्वतंत्र काऊंटर सुरु करून गती वाढवावी. ज्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना रबी हंगामात पीक कर्ज मिळून बी बियाणे खरेदीसाठी मदत मिळेल, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.