परभणी: पाण्याची नासाडी करणाऱ्या तिघांना मनपाकडून दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:35 PM2019-04-08T23:35:48+5:302019-04-08T23:36:38+5:30
नळाला आलेल्या पाण्याची नासाडी करणाऱ्या तिघांना महापालिकेने प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नळाला आलेल्या पाण्याची नासाडी करणाऱ्या तिघांना महापालिकेने प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावला आहे.
शहरात निर्माण झालेली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन मनपाने पथकांची स्थापना केली असून हे पथक पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी शहरात फिरत आहे. नळाला पाणी आल्यानंतर पथकातील अधिकारी, कर्मचारी प्रभागात फिरुन पाहणी करतात. ८ एप्रिल रोजी या पथकाने मासूम कॉलनी, अजमेर कॉलनी, गांधी पार्क आदी ठिकाणी पाहणी केली. यावेळी काही महिला रस्त्यावर पाणी टाकत असल्याचे तर काही जण दुचाकी धूवत असताना तर काहीजण नळाचे पाणी कुपनलिकेत सोडत असल्याचे आढळले. या सर्वांना समज देण्यात आली. त्यापैकी तिघांना दंड ठोठावण्यात आला. या पथकामध्ये मुक्तसीर खान, अलकेश देशमुख, शिवाजी सरनाईक, मेहराज अहमद, सतीश राऊत, मिनहाज अन्सारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुºहा, करण गायकवाड, शेख शादाब, शेर खान, डी.एल. शिंदे आदी २२ जणांचा सहभाग आहे. नागरिकांनी नळांना तोट्या बसवून घ्याव्यात अन्यथा दंड आकारला जाईल, असा इशारा मनपाने दिला आहे.