परभणी ; ‘पिपल्स रिपब्लिकन’चे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 10:49 PM2020-03-06T22:49:17+5:302020-03-06T22:49:53+5:30

संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भूमीहिन शेतमजूर व श्रावणबाळ योजनेंतर्गत जाचक अटी रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी दलित मुक्ती सेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़

Parbhani; People's Republican Movement | परभणी ; ‘पिपल्स रिपब्लिकन’चे आंदोलन

परभणी ; ‘पिपल्स रिपब्लिकन’चे आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी भूमीहिन शेतमजूर व श्रावणबाळ योजनेंतर्गत जाचक अटी रद्द कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी दलित मुक्ती सेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़
महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात जायकवाडी कॅनॉलच्या जागेवरील रहिवाशांना रमाई आंबेडकर आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेचा लाभ द्यावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी २१ हजार रुपयापर्यंतचे उत्पन्न करण्यात यावे, सुशिक्षित बेरोजगारांना मासिक ५ हजारांचे अर्थसहाय्य देण्यात यावे, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे व इतर महामंडळांकडून मिळणारे कर्ज विनाअट माफ करावे आदी मागण्यांसाठी शुक्रवारी पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़ निवेदनावर गौतम मुंडे, अरुण गायकवाड, प्रकाश सदावर्ते, आशाबाई मस्के, प्रवीण मोरे, दीपक धापसे, संजय शिंदे, हिरामन खंदारे, लक्ष्मीबाई जोगदंड, गंगााधर गायकवाड, अमोल सरकटे, रुख्मिणबाई वाकोडे, निर्मलाबाई वाढे, विमलबाई मालपाणी, अर्चना पंडित आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत़
अंगणवाडी सेविका, मदतनिस महासंघाचे आंदोलन
परभणी : महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची सोडवणूक व्हावी, यासाठी शुक्रवारी अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने जि़प़च्या महिला व बालविकास कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़
४परभणी तालुक्यातील पिंगळी अंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे प्रलंबित मानधन तत्काळ अदा करावे, प्रवास भत्ता, इंधन बिल तत्काळ देण्यात यावे, टाकळी बोबडे येथील अंगणवाडी सेविकांना सेवेची एक संधी देवून कामावर रुजू करून घ्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले़
४आंदोलनानंतर महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़ निवेदनावर जिल्हाध्यक्ष बाबाराव आवरगंड, प्रदेशाध्यक्ष भगवान देशमुख आदींच्या स्वाक्षºया आहेत़

Web Title: Parbhani; People's Republican Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.