परभणी: विधानसभेचे चित्र वंचित बदलेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:16 AM2019-08-29T00:16:15+5:302019-08-29T00:16:52+5:30
आलुतेदार, बलुतेदार, भटके, विमुक्तांना सत्तेत पाठविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे़ या सर्व लहान घटकांनी खंबीरपणे आघाडीच्या पाठीशी उभे राहिल्यास विधानसभेचे चित्र निश्चित बदलेल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता गोविंद दळवी यांनी व्यक्त केला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आलुतेदार, बलुतेदार, भटके, विमुक्तांना सत्तेत पाठविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली आहे़ या सर्व लहान घटकांनी खंबीरपणे आघाडीच्या पाठीशी उभे राहिल्यास विधानसभेचे चित्र निश्चित बदलेल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ता गोविंद दळवी यांनी व्यक्त केला़
२७ आॅगस्ट रोजी सखा गार्डन येथे वंचित बहुजन आघाडीचा मेळावा पार पडला़ या प्रसंगी दळवी बोलत होते़ अध्यक्षस्थानी आलमगीर खान तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य सचिव भीमराव दळे, जिल्हाध्यक्ष धर्मराज चव्हाण, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अॅड़ इम्तीयाज खान, मारोतराव पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती़ इम्तीयाज खान यांनी प्रास्तविकात बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका विशद केली़
या प्रसंगी इंजि़ चंदासिंग, गजानन मरगळ, मधुकर काळे, शेळके महाराज, अंगद सोगे, दिलीप मोरे, सिद्धार्थ भाग्यवंत, प्रा़ के़डी़ चव्हाण, सुभाष पांचाळ, कृष्णा राऊत, यज्ञकांत वाघ, भगवान देवरे, लखन सौंदरमल, वंदना जोंधळे, अनिता वाघमारे, अखिल भाई, अमीत राठोड, सुमीत जाधव आदी उपस्थित होते़ यावेळी जिल्हाध्यक्ष धर्मराज चव्हाण म्हणाले, येणारी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून सर्व भटके, विमुक्त, वंचितांची मजबूत मूठ बांधल्यास चारही विधानसभा हाती घेऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला़
या मेळाव्यात इंद्रायणी मित्र मंडळाचे अध्यक्ष किशन गव्हाणे, वडी येथील ग्रामपंचायत सदस्य बळीराम तायडे, शिकलकरी समाजाचे भोलासिंग बरीयामसिंग टाक, धनगर समाजातील ज्ञानेश्वर बोबडे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला़ राहुल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले़ चंदासिंग यांनी आभार मानले़