परभणी :पिंगळगड नाल्यावरील पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 11:43 PM2018-03-20T23:43:06+5:302018-03-20T23:45:14+5:30

गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर उभारलेल्या पुलाला खालील बाजुने तडे गेले असून, अनेक ठिकाणी गज उघडे पडल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून पुलाच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़

Parbhani: The Pingalguda Nullah Bridge is dangerous | परभणी :पिंगळगड नाल्यावरील पूल धोकादायक

परभणी :पिंगळगड नाल्यावरील पूल धोकादायक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गंगाखेड रस्त्यावरील पिंगळगड नाल्यावर उभारलेल्या पुलाला खालील बाजुने तडे गेले असून, अनेक ठिकाणी गज उघडे पडल्याने या पुलावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घालून पुलाच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे़
परभणी-गंगाखेड या राज्य महामार्गावर परभणी शहराजवळून पिंपगळगड नाला वाहतो़ या नाल्यावर पूल उभारण्यात आला आहे़ सध्या या पुलाची दुरवस्था झाली असून, वाहनधारकांसाठी हा पूल धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे़ या पुलावरून एखादे वाहन पुढे गेल्यास पाच फुट अंतरापर्यंत हादरे बसत आहेत़ परभणी ते गंगाखेड हा राज्य महामार्ग असून, या मार्गावर वाहनांची संख्याही मोठी आहे़ लातूर, गंगाखेड, परळी आणि कर्नाटकामध्ये जाणारी वाहतूक याच मार्गावरून केली जाते़ दररोज हजारो वाहने या पुलावरून धावतात़
दररोजच्या वाहनांचा भार सहन करण्याची क्षमता या पुलात सध्या उपलब्ध असली तरी पुलाच्या स्लॅबचे गज उघडे पडल्याने आगामी काळात धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दगडी खांबावर स्लॅब टाकून हा पूल उभारण्यात आला आहे़ पुलाखालून स्लॅबचे निरीक्षण केले असता, अनेक ठिकाणी गज उघडे पडले आहेत़ तर काही भागात पुलाचा स्लॅब एका बाजुला झुकल्याचे दिसत आहे़ त्यामुळे या पुलावरुन वाहतूक करणे धोकादायक ठरत आहे़ त्यामुळे वेळीच दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
तेव्हा सार्वजनिक बाधंकाम विभागाने तज्ज्ञामार्फत या पुलाची पाहणी करून तांत्रिक दृष्टीकोणातून पुलाची डागडुजी करण्यासाठी पावले उचलावित, अशी मागणी होत आहे़
पुलावरील कठडे गायब
पिंगळगड नाल्याच्या पुलावरील दोन्ही बाजुंची कठडे सहा महिन्यांपासून गायब झाले आहेत़ या पुलाला लोखंडी कठडे बसविले होते़ परंतु, सद्यस्थितीत दोन्ही बाजुला कठडे गायब आहेत़ गंगाखेडकडे जाताना उजव्या बाजुचे कठडे तर पूर्णत: गायब झाले असून, रात्री-अपरात्री भरधाव जाणाऱ्या वाहनधारकांना पूल लक्षात आला नाही तर अपघातही होण्याची शक्यता आहे़ तेव्हा या पुलाला दोन्ही बाजुंनी पक्के कठडे बसवावेत, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: The Pingalguda Nullah Bridge is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.