परभणी : पालम शहरासाठी ५६ कोटींची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:40 AM2019-01-17T00:40:02+5:302019-01-17T00:40:39+5:30

पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे़

Parbhani: A plan of 56 crores for Palam city | परभणी : पालम शहरासाठी ५६ कोटींची योजना

परभणी : पालम शहरासाठी ५६ कोटींची योजना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून ५६ कोटी ६४ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून, या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत़ त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये पालम शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार आहे़
दरवर्षी उन्हाळ्यात पालम शहराला पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो़ या ठिकाणी तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्या तरी गोदावरी नदीतील पाणी आटल्यानंतर आणि भूजल पातळी खोल गेल्यानंतर पालम शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते़ मागील अनेक वर्षांपासून हा प्रश्न दरवर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होत आहे़ त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी जीवन प्राधिकरणाच्या वतीने प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे़ या योजनेसाठी ५६ कोटी ६४ लाख रुपये मंजूर झाले असून, १६ जून रोजी योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़ लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणातून या योजनेसाठी पाणी घेतले जाणार आहे़ या योजनेचे कार्यारंभ आदेशही देण्यात आले असून, एक-दोन आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे़
पालम शहरवासियांना दरवर्षी टंचाईच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते़ पालम शहर आणि परिसरात मोठा जलस्त्रोत उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण होते़ त्यावर मात करण्यासाठी आता लोहा तालुक्यातून शहरासाठी पाणी घेतले जाणार आहे़ साधारण: १५० किमी अंतराची जलवाहिनी टाकली जाणार आहे़ विशेष म्हणजे या पाणीपुरवठा योजनेचे काम ग्रीड पद्धतीने केले जाणार आहे़ मुंबई येथील घुले कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले असून, २४ महिन्यांच्या काळात काम पूर्ण करावयाचे आहे़ त्यामुळे दोन वर्षामध्ये पालम शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघण्याची चिन्हे आहेत़
योजनेंतर्गत होणारी कामे
लोहा तालुक्यातील लिंबोटी धरणापासून ते पालम शहरातील जलकुंभापर्यंतची कामे या योजनेंतर्गत केली जाणार आहेत़ त्यात मुख्य उद्भव विहीर, पंप घर, अशुद्ध जलपम्पिंग मशिनरी, उद्धरण नलिका, जलशुद्धीकरण केंद्र आणि उंच सलोह टाक्यांची उभारणी केली जाणार आहे़ या अंतर्गत उद्भव विहिरीच्या कामाचे मार्कआऊटही कंत्राटदारास देण्यात आले आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांतच या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होईल, अशी माहिती जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस़व्ही़ कायंदे यांनी दिली़
ग्रीड पद्धतीने होणार काम
पालमसाठी मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम ग्रीड पद्धतीने केले जाणार आहे़ यात अंतर्गत जलवाहिनीचा समावेश नसतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले़
प्रती माणसी ४० लिटर पाण्याचे केले नियोजन
पालम शहराची सध्याची लोकसंख्या ९४ हजार ४८७ एवढी असून, २०३४ मध्ये ही लोकसंख्या १ लाख १७ हजार १६० एवढी होईल, अशी अपेक्षा गृहित धरून १५ वर्षांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे़ या योजनेंतर्गत प्रति माणशी प्रति दिन ४० लिटर पाणी दिले जाणार असून, दररोज या योजनेतून पालम शहराला ६़१७६ दललि पाणी मिळणार आहे़ त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर शहरवासियांची पाणीटंचाई दूर होईल़
चारठाणा योजनेचे काम अंतिम टप्प्यात
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंर्गत ४ कोटी रुपये खर्चातून पाणीपुरवठा योजना उभारली जात आहे़ ही योजनाही १५ वर्षांची असून, १२ हजार ५९२ लोकसंख्या गृहित धरून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे़ जुलै २०१८ मध्ये या योजनेच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली़ चारठाणा तलावातील बुडीत क्षेत्रातून गावासाठी पाणी घेतले जाणार आहे़ या योजनेच्या निविदा अंतिम झाल्या असून, लवकरच या कामाचे कार्यारंभ आदेशही दिले जाणार आहेत़ २ उद्भव विहीर, उद्धरण वाहिनी, जलकुंभ आणि अंतर्गत वितरण व्यवस्था आदी कामे केली जाणार आहेत़

Web Title: Parbhani: A plan of 56 crores for Palam city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.