परभणी : गंगाखेड शहरात प्लॅस्टिक बंदी अद्यापही कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:34 AM2019-06-26T00:34:18+5:302019-06-26T00:34:38+5:30
पर्यावरणास धोकादायक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचे वस्तू उत्पादन तसेच वापरावर मागील वर्षी शासनाने बंदी आणली. गंगाखेड शहरात मात्र कॅरीबॅग प्लॅस्टिकची चढ्या दरात विक्री तसेच वापर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): पर्यावरणास धोकादायक ठरणाऱ्या प्लॅस्टिकचे वस्तू उत्पादन तसेच वापरावर मागील वर्षी शासनाने बंदी आणली. गंगाखेड शहरात मात्र कॅरीबॅग प्लॅस्टिकची चढ्या दरात विक्री तसेच वापर होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पर्यावरणास धोकादायक ठरत असलेल्या मायक्रो पॉलिथीनच्या कॅरीबॅग तसेच प्लॅस्टिकपासूून निर्माण करण्यात आलेली पत्रावळी, प्लेट आदी वस्तूंचे उत्पादन तसेच विक्रीवर राज्य शासनाने गतवर्षी जून २०१८ मध्ये बंदी आणली आहे. शासनाने बंदी आणल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस नगरपालिका प्रशासनाने कॅरीबॅग व प्लॅस्टिकच्या वस्तुंची विक्री करणाºया व्यापाऱ्यांच्या दुकानावर धाडी टाकून मोठ्या प्रमाणात कॅरीबॅग व प्लॅस्टिकच्या वस्तू जप्त करून दंडात्मक कार्यवाही केली. त्यानंतर मात्र नगरपालिका प्रशासनाने कार्यवाहीकडे दुर्लक्ष केल्याने प्लॅस्टिक वस्तू व कॅरीबॅगवर बंदी असताना सुद्धा शहरातील व्यापारी या बंदीच्या नावाखाली छुप्या पद्धतीने या वस्तुंची चढ्या दराने विक्री करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. कॅरीबॅग व प्लॅस्टिक वस्तुंची शहरात खुलेआम विक्री होत असल्याने बाजारपेठेतील छोटे-मोठे किराणा मालाचे व्यापारी, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, मसाला वस्तुंची विक्री करणारे बिनधास्तपणे ग्राहकांना कॅरीबॅग, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दुकानातील साहित्य देत असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळाले. मोठ्या प्रमाणात वापरात येणाºया कॅरीबॅग, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पत्रावळी, द्रोण, ग्लासचा वापर करून या वस्तू रस्त्यावर नाल्याजवळ फेकून दिल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील लहान-मोठ्या सर्वच नाल्या प्लॅस्टिकच्या कचºयाने तुडूंब भरल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळत आहे.
नगरपालिका प्रशासनाकडून कारवाईला येईना वेग
४दोन दिवसांपूर्वी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी खुद्द प्लॅस्टिकच्या वापरावरुन सेलूत संताप व्यक्त केला होता. या घटनेनंतर जिल्ह्यात प्लॅस्टिक वापराविरुद्ध नगरपालिका प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा होती.
४ पर्यावरण मंत्र्यांनी संताप व्यक्त करूनही गंगाखेड नगरपालिका प्रशासनाकडून कॅरीबॅग व प्लॅस्टिक बंदीच्या वापरावरून ठोस पावले उचलली जात नाहीत. परिणामी दिवसेंदिवस गंगाखेड शहरातील कॅरीबॅगचा वापर वाढत चालला आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्ेण्याची गरज निर्माण झाली आहे.