परभणी : मिरवणुकीत गाणे वाजविण्यावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:03 AM2019-06-08T00:03:58+5:302019-06-08T00:04:27+5:30
तालुक्यातील पिंप्री येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३ जूून रोजी मिरणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गाणे वाजविण्याच्या कारणावरून बँड पथकातील वाजंत्रीना रस्त्यात आडवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पिंप्री येथील १६ जणांविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील पिंप्री येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३ जूून रोजी मिरणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गाणे वाजविण्याच्या कारणावरून बँड पथकातील वाजंत्रीना रस्त्यात आडवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पिंप्री येथील १६ जणांविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्री येथे ३ जून रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान तालुक्यातील कोद्री येथील आकाश शिवाजी सावंत यांच्या बँड पथकाला वाजंत्रीचे काम देण्यात आले होते. वाजंत्री म्हणून वाद्य घेऊन पिंप्री येथे आलेल्या बँड पथकातील आकाश शिवाजी सावंत, अविनाश नारायण ढेंगळे, अजय आनंद हनवते, विकास बलभीम किरवले, सूरज जगतकर, दत्ता प्रकाश सावंत, पवन रोडे, उत्तम शिवाजी सावंत, धुराजी खांडेकर, अनिकेत शिवाजी सावंत, शुभम शिवाजी सावंत हे मिरवणुकीमध्ये वाद्य वाजवित असताना रात्री ८:३० वाजेच्या सुमारास गोविंद मुठाळ व इतरांनी एकाच वेळी दोन वेगवेगळे गाणे वाजविण्यास सांगितले. एकाच वेळी दोन गाणे वाजविणे शक्य नाही, कोणते एक गाणे वाजवायचे ते सांगा, असे प्रितम सावंत याने सांगितले. तेव्हा गोविंद मुठाळ व त्याच्या सोबतच्या व्यक्तींनी त्यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. मिरवणूक संपवून बँड पथकातील वाजंत्री रात्री ९:३० वाजेच्या सुमारास आॅटोने गंगाखेडकडे जाण्यास निघाले. त्यावेळी पिंप्री शिवारात रस्त्यावर दगड टाकून वाजंत्रीचा आॅटोरिक्षा आडवून गोविंद मुठाळ, बाळू मुठाळ, अंकूश भिसे, किरण दिगंबर भिसे, माऊली भास्कर भिसे, शिवप्रसाद रामचंद्र भिसे, बालाजी जनार्दन भिसे, विष्णू मोतीराम भिसे, दयानंद भिसे, लल्लू प्रकाश भिसे, नामदेव मुंजाजी भिसे (सर्व रा.पिंप्री) व इतर ५ जणांनी लाकडी दांड्याने पथकातील वाजंत्रीना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली. आॅटोरिक्षा (एमएच २५ एम १३३२) व बँडच्या सामानाची नासधूस केली. यात ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद आकाश सावंत यांनी दिली आहे. त्यावरुन ६ जून रोजी सायंकाळी गंगाखेड पोलीस ठाण्यात एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजीले, सपोनि राजेश राठोड हे करीत आहे.