परभणी : पीक विम्यासाठी केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:52 AM2019-07-22T00:52:35+5:302019-07-22T00:52:48+5:30
तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शहरातील आॅनलाईन केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून १०० ते १५० रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. या प्रकाराकडे मात्र महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने केंद्रचालकांचे चांगलेच फावत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी शहरातील आॅनलाईन केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. या गर्दीचा फायदा घेत केंद्र चालकांकडून १०० ते १५० रुपयांची लूट केली जात असल्याचा प्रकार सर्रास दिसून येत आहे. या प्रकाराकडे मात्र महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने केंद्रचालकांचे चांगलेच फावत आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमा भरण्यासाठी शासनाने २४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. सुरुवातीला पीक विमा भरण्यासाठी शेतकरी फारसे आॅनलाईन केंद्राकडे फिरकले नाहीत. मात्र पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला आहे; परंतु, अद्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. पेरणी केलेल्या पिकांची उगवण झाली असून, या पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आता परिस्थिती बिकट बनणार असे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे.
मागील काही दिवसांपासून तलाठी संपर्क कार्यालये आणि आॅनलाईन केंदे्र फुलून गेली आहेत.
दिवसभर आॅनलाईन केंद्रावर थांबूनही अनेकांचे अर्ज भरले जात नाहीत. अशा शेतकºयांकडून अर्ज भरून घेण्यासाठी केंद्र चालकांकडून एका अर्जासाठी १०० ते १५० रुपये जास्तीचे आकारले जात आहेत. यासाठी कोणतीही पावती दिली जात नाही. त्यामुळे एकीकडे शेतकºयांची लूट होत असताना दुसरीकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.
सातबारा काढण्यासाठी तलाठ्यांकडे गर्दी
४पीक विमा भरण्यासाठी आॅनलाईन सातबारा आवश्यक आहे. मात्र सेतू सुविधा केंद्रावर आता आॅनलाईन सातबारा देणे बंद करण्यात आल्याने तलाठ्यांकडूनच आॅनलाईन सातबारा घ्याव्या लागत आहे. विशेष म्हणजे एका तलाठ्याकडे चार ते पाच गावे येत असल्याने सातबारा काढण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. परिणामी सातबारा वेळेवर मिळत नाहीत.
४या सातबारा वेळेवर मिळत नसल्याने शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर २४ जुलैपर्यंत सर्वच तलाठ्यांनी मुख्यालयी हजर राहून कागदपत्रे वितरित करावीत, बायोमेट्रिक हजेरी नोंदवावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी काढले आहेत. त्यामुळे आता तरी शेतकºयांना वेळेत सातबारा मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.