परभणी : ‘पीएम’चे जिंतूरमध्ये सर्वाधिक लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:08 AM2020-02-17T00:08:53+5:302020-02-17T00:09:26+5:30
पीएम किसान योजनेत जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, आधार क्रमांकासह अपडेट असणाºया या शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पीएम किसान योजनेत जिंतूर तालुक्यातील सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, आधार क्रमांकासह अपडेट असणाºया या शेतकऱ्यांना आता थेट त्यांच्या बँक खात्यावर मानधन जमा होणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांना पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर त्यांची नावे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पोर्टलवरील पात्र शेतकºयांना तीन महिन्यांतून एक वेळा २ हजार रुपये या प्रमाणे लाभ दिला जात आहे.
जिल्ह्यात सुमारे सव्वा तीन लाख शेतकरी असले तरी प्रत्यक्षात पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर २ लाख ९१ हजार ४७७ शेतकºयांची नावे अपलोड झाली असून, या शेतकºयांना मानधन दिले जात आहे. १२ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने पीएम किसान योजनेतील शेतकºयांची तालुकानिहाय संख्या जाहीर केली.
मध्यंतरी आधार क्रमांकाच्या आधारावरच शेतकºयांना लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
जिल्हा प्रशासनाने पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर अपडेट असणाºया शेतकºयांची संख्या नुकतीच जाहीर केली आहे. या संख्येनुसार जिंतूर तालुक्यात सर्वाधिक ५१ हजार ६४२ शेतकरी योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. तर दुसरीकडे सोनपेठ तालुक्यातील केवळ १८ हजार २४० शेतकरी या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत.
३१ डिसेंबरपासून या शेतकºयांना आधार क्रमांकावर आधारित मानधनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून जिल्ह्यातील शेतकºयांची नावे आधार क्रमांकानुसार अपडेट करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. त्यास शेतकºयांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून, निम्म्याहून अधिक शेतकºयांनी आपली नावे आधार क्रमांकानुसार अपडेट केली आहेत. त्यामुळे हे शेतकरी किसान सन्मान योजनेच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. आधार अपलोडींग शिल्लक असणाºया शेतकºयांनी आधार क्रमांक अपलोड केल्यानंतर त्यांनाही या योजनेचा लाभ सुरू होणार असल्याची माहिती मिळाली.
आधार संकलनाचे काम सुरूच
४पीएम किसान योजनेमध्ये आधार क्रमांक नसलेल्या शेतकºयांची संख्या सुरुवातीला ८० हजार पेक्षाही अधिक होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने गावा-गावात योजनेची जनजागृती करुन शेतकºयांना त्यांचे आधार क्रमांक आणि आधार क्रमांकानुसार पीएम किसान पोर्टलवरील शेतकºयाचे नाव अपडेट करुन घेण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या माध्यमातूनही शेतकºयांचे आधार क्रमांक संकलित करण्यात आले. त्याचा परिणाम निम्म्यापेक्षा अधिक शेतकºयांचे आधार क्रमांक संकलित झाले असून, आता केवळ १२ हजार शेतकºयांचे आधार क्रमांक संकलित करणे शिल्लक आहेत. या शेतकºयांचे आधार क्रमांक संकलनाचे काम अजूनही सुरू आहे. ज्या शेतकºयांची नावे आधारनुसार अपडेट झाली नाहीत ते शेतकरी मानधन योजनेपासून वंचित राहू शकतात. तेव्हा शेतकºयांना अजूनही संधी असून, त्यांनी आधार क्रमांक आणि आधार नुसार त्यांची नावे अपडेट करुन घ्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.