परभणी : क्षुल्लक कारणावरून महिलेस पाजले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:59 AM2019-12-20T00:59:09+5:302019-12-20T00:59:36+5:30

पाण्याचा बोअर व फ्लॅट आम्हाला वापरायला का देत नाही, असे म्हणत एका महिलेस विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १६ डिसेंबर रोजी रात्री तालुक्यातील पांढरवाडी येथे घडली. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Parbhani: Poisoned woman poisoned for trivial reasons | परभणी : क्षुल्लक कारणावरून महिलेस पाजले विष

परभणी : क्षुल्लक कारणावरून महिलेस पाजले विष

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : पाण्याचा बोअर व फ्लॅट आम्हाला वापरायला का देत नाही, असे म्हणत एका महिलेस विषारी द्रव पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना १६ डिसेंबर रोजी रात्री तालुक्यातील पांढरवाडी येथे घडली. याप्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील पांढरवाडी येथील अश्विनी नवनाथ बंडगर (वय २३) आणि सुग्रीव व्यंकटी बंडगर, संग्राम व्यंकटी बंडगर, व्यंकटी हरिभाऊ बनगर यांच्यात असलेला सामायिक पाण्याचा बोअर, फ्लॅट वापरला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून आपसात वाद होत होते. १६ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सुग्रीव बंडगर, संग्राम बंडगर, व्यंकटी बंडगर या तिघांनी अश्विनी बंडगर यांच्या घरात प्रवेश केला. यानंतर अश्विनी बंडगर, विजय बंडगर, रेणुका बंडगर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. संग्राम बंडगर व व्यंकटी बंडगर यांनी फिर्यादी अश्विनी बंडगर यांचा दीर विजय बंडगर, जाऊ रेणुका बंडगर यांना पकडून ठेवले तर सुग्रीव बंडगर याने अश्विनी बंडगर यांना पलंगावर आडवे पाडून खिशातून विषारी द्रवाची बाटली काढली.
तुमच्या घरातील एखाद्या माणसाचा काटा काढल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, आता तुम्हाला दाखवतो असे म्हणत विषारी द्रवाची बाटली अश्विनी बंडगर यांच्या तोंडाला लावली. तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने बाटलीतील द्रव तोंडात टाकल्याची फिर्याद १७ डिसेंबर रोजी अश्विनी बंडगर यांनी पोलीस ठाण्यात दिली.
यावरुन पिंपळदरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि राजकुमार पुजारी, जमादार मारोती माहुरे हे करीत आहेत.

Web Title: Parbhani: Poisoned woman poisoned for trivial reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.