परभणी : ९ जुगाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:06 AM2020-02-17T00:06:09+5:302020-02-17T00:06:26+5:30

परभणी शहरासह तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका आणि जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापे टाकून ९ जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ या दोन्ही प्रकरणात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

Parbhani: Police action against 4 gamblers | परभणी : ९ जुगाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

परभणी : ९ जुगाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहरासह तालुक्यातील दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका आणि जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापे टाकून ९ जणांविरूद्ध कारवाई केली आहे़ या दोन्ही प्रकरणात आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
परभणी जिल्ह्यात मटका, जुगार सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर पोलिसांनी याविरूद्ध कारवाईचे सत्र सुरू केले आहे़ दोन दिवसांपासून जिल्ह्यात विविध भागांत छापे टाकले जात आहेत़ शहरातील नानलपेठ आणि नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन कारवाया करण्यात आल्या़ त्यात आरोपी युनूस खान बिस्मिल्ला खान (रा़ गुलशना बाग), अकबर खान (रा़ गाडी मोहल्ला) व सय्यद अजहर सय्यद खलील (रा़ मकदूमपुरा) हे लोकांना पैशांचे आमिष दाखवू मटक्याच्या आकड्यांच्या चिठ्ठ्या देऊन जुगार चालवित असताना पोलिसांना आढळून आले़ अशोक नगर आणि जिल्हा परिषदेच्या संरक्षक भिंतीलगत हा जुगार चालविला जात होता़ त्यावेळी पोलिसांनी छापा टाकून कारवाई करीत रोख ३ हजार १६० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले़ या प्रकरणी नानलपेठ व नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
त्याचप्रमाणे दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जांब शिवारात बाबासाहेब रेंगे यांच्या शेत आखाड्यावर हारजीत, तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला़
या छाप्यात रोख ९०० रुपये, ५ मोटारसायकल असा १ लाख ६५ हजार ९०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला़ या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध दैठणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे़ ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक आऱ रागसुधा, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शरद बिपट, मधुकर चट्टे, हनुमान जक्केवार, बाळासाहेब तुपसुंदरे, शरद मुलगीर, भगवान भुसारे, विशाल वाघमारे, अनिल कोनगुलवार यांच्या पथकाने केली़
सलग दुसºया दिवशीही कारवाई
४जिल्ह्यात ग्रामीण भागासह शहरातही मटका जुगार खुलेआम सुरू असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत. १५ फेब्रुवारी रोजी कोतवाली पोलीस ठाणे, पूर्णा येथे कारवाया करण्यात आल्या. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले.

Web Title: Parbhani: Police action against 4 gamblers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.