परभणी : बारा दुकाने फोडणारी टोळी पोलिसांनी पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:45 AM2018-07-26T00:45:52+5:302018-07-26T00:46:32+5:30
परभणीसह मानवत, पाथरी येथे एकाच रात्री १२ दुकाने फोडणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून बोलेरो गाडीसह अटक केली आहे़ विशेष म्हणजे या चोरीतील ६ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणीसह मानवत, पाथरी येथे एकाच रात्री १२ दुकाने फोडणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून बोलेरो गाडीसह अटक केली आहे़ विशेष म्हणजे या चोरीतील ६ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़
अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि या प्रकरणाचा तपास करणारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी या सर्व प्रकरणाची माहिती पत्रकारांना दिली़ १७ जुलै रोजी मध्यरात्री परभणी शहरातील खानापूर फाटा, पाथरी, मानवत येथे बारा दुकाने फोडून चोरटे पसार झाले होते़ एकाच दिवशी शटर उचकून केलेल्या या चोºयामुळे व्यापाºयांमध्ये दहशत निर्माण झाली होती़ विशेष म्हणजे बोलेरो गाडी घेऊन या चोºया करण्यात आल्या़ स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी चोरीच्या तपासासाठी पथकप्रमुख उपनिरीक्षक विवेक सोनवणे यांच्यासह कर्मचाºयांचे पथक तयार केले़ हे चोरटे नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे असल्याची माहिती या पथकाला मिळाली़ त्यावरून दीपकसिंग प्रल्हादसिंग टाक (रा़ गुरुगोविंदसिंग नगर, जालना), राजूसिंग मायासिंग बावरी, अर्जुनसिंग पंडितसिंग जुन्नी, शंकर मरिबा नामेवार (तिघे रा़ उमरी) यांना ताब्यात घेतले़ चारही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे़ या आरोपींकडून ३़५ ग्रॅम सोने, १ किलो ९०० ग्रॅम चांदी, ५ मोबाईल यासह परभणीत चोरी केलेल्या जिन्स पँट, अंडरवेअर, साबन आणि किराणा साहित्य तसेच बोलेरो गाडी असा ६ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख उपनिरीक्षक विवेक सोनवणे, सुग्रीव केंद्रे, शिवदास धुळगुंडे, निलेश भुजबळ, सय्यद मोईन, किशोर चव्हाण, शंकर गायकवाड, श्याम काळे, सय्यद मोबीन, शेख अजहर, अरुण कांबळे, यशवंत वाघमारे, गणेश कौटकर आदींनी केली़ या चोरट्यांनी आंध्रप्रदेशात ८, धर्माबाद येथे १, जालना व पुणे येथे प्रत्येकी २ गुन्हे केल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले़
अशी आहे गुन्ह्याची पद्धत
स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या चार आरोपींपैकी दीपकसिंग टाक हा सराईत गुन्हेगार आहे़ चोºया करण्यासाठी त्याने तरबेज वाहनचालक आणि इतर दोन आरोपींची निवड केली़ त्यापैकी एक आरोपी कात्रीच्या सहाय्याने मास्टर चावी तयार करून तिचा उपयोग वाहन चोरण्यासाठी करीत असे़ जालना येथून या आरोपींनी एक टाटासुमो गाडी चोरली़ तेथून ते निजामाबाद, नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे आले़ या ठिकाणी बोलेरो गाडी चोरून त्यांनी नांदेडमार्गे परभणी गाठली़ जिल्ह्यात परभणी, मानवत, पाथरी येथे चोºया करून पुणे येथे गेले़ चाकण हद्दीत चोरलेली बोलेरो सोडून देत त्या ठिकाणी दुसरी बोलेरो गाडी चोरी केली़ तेथून पुढे ते परत पुणे येथे आले आणि या ठिकाणीच पोलिसांच्या तावडीत सापडले़ परभणी पोलिसांनी या चार आरोपींना अटक केल्यामुळे परभणीसह निजामाबाद, उमरी, धर्माबाद, पुणे आदी ठिकाणचे गुन्हेही उघडकीस येणार आहेत़