परभणीत पोलीस वसाहतीची दूरवस्था : पोलिसांचेच कुटूंबिय असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:14 AM2018-08-29T00:14:42+5:302018-08-29T00:15:47+5:30
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य वृंद्धीगत करण्यासाठी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाºयांचे कुटूंबियच ढिगारभर समस्यांमुळे असुरक्षित झाले आहे़ शहरातील पोलीस वसाहतीतील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, या समस्यांकडे लक्ष देण्यास प्रशासनाला मात्र वेळ नसल्याचे दिसत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व पर्यायाने सामाजिक स्वास्थ्य वृंद्धीगत करण्यासाठी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाºयांचे कुटूंबियच ढिगारभर समस्यांमुळे असुरक्षित झाले आहे़ शहरातील पोलीस वसाहतीतील समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, या समस्यांकडे लक्ष देण्यास प्रशासनाला मात्र वेळ नसल्याचे दिसत आहे़
येथील नानलपेठ भागात पोलीस कर्मचाºयांच्या कुटूंबियांसाठी निवासस्थाने उभारण्यात आली आहेत़ पोलीस मुख्यालयाच्या परिसरात उभारलेल्या या निवासस्थानांमध्ये सध्या अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे़ जुनाट झालेली घरे, वर्षानुवर्षापासून डागडुजी नसल्याने जागोजागी गळणारे छत या अंतर्गत समस्यांबरोबरच वसाहतींमधील रस्त्यांवर साचलेला चिखल आणि पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटल्याने मिळणारे अशुद्ध पाणी यामुळे पोलीस कुटूंबियांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ शहरी भागात राहूनही महापालिकेचे या वसाहतीकडे दुर्लक्ष होत आहे़ आठवडाभरापूर्वी झालेल्या पावसामुळे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून, घरापर्यंत जाणेही कठीण होत आहे़ याशिवाय पिण्याचे पाणी, पथदिवे या समस्या कर्मचाºयांच्या कुटूंबियांना त्रासदायक ठरत आहेत़ कर्मचारी निवासस्थानांची मागील अनेक वर्षांपासून दुरुस्ती झाली नाही़ त्यामुळे या निवासस्थानांवर चक्क झाडांनीच कब्जा केला आहे़ झाडांच्या मुळांमुळे निवासस्थाने अधिकच धोकादायक बनली आहेत़ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही बांधकाम विभाग प्रतिसाद देत नसल्याने आहे त्या अवस्थेत दिवस काढण्याची वेळ कर्मचाºयांवर आली आहे़ प्रशासनाने या भागात सुविधा पुरवाव्यात आणि पोलीस कर्मचारी कुटूंबियांच्या आरोग्याचे प्रश्नही सोडवावेत, अशी मागणी होत आहे़
२० वर्षांपासून दुरुस्ती नाही
देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे़ वारंवार पत्रव्यवहार करूनही हा विभाग प्रतिसाद देत नसल्याच्या तक्रारी आहेत़ १९९८ मध्ये या परिसराची डागडुजी करण्यात आली होती़ त्यानंतर मात्र निधी नसल्याचे कारण पुढे करीत दुरुस्ती करण्यात आली नाही़ त्यामुळे वसाहतीतील समस्यांमध्ये वाढ झाली आहे़
जलवाहिनीला : जागोजागी गळती
पोलीस मुख्यालयामध्ये कर्मचाºयांसाठी असलेल्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ तसेच वसाहतीतील सांडपाणी वाहून नेणारी वाहिनीही फुटल्याने हे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळते आणि कर्मचारी कुटूंबियांना दूषित पाणी पुरवठा होत आहे़ यामुळे साथरोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे़ पावसाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर होते़ महापालिकेने वसाहत परिसरात फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करावी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने वसाहतीतील प्रत्येक इमारतींवर सांड पाणी वाहून नेणारे पाईप बदलून नवीन पाईप टाकावेत, अशी या कर्मचारी कुटूंबियांची मागणी आहे़