परभणी :अडथळा ठरणाऱ्या ६० गाड्या पोलिसांनी उचलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 12:24 AM2018-07-03T00:24:16+5:302018-07-03T00:25:41+5:30
वाहतुकीला अडथळा ठरणारी ६० दुचाकी वाहने टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेने सोमवारी दिवसभरात केलेल्या या कारवाईने वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वाहतुकीला अडथळा ठरणारी ६० दुचाकी वाहने टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेने सोमवारी दिवसभरात केलेल्या या कारवाईने वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
परभणी शहर वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने उपाययोजना सुरु केली आहे. चार दिवसांपासून शहरात टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने वाहने उचलून थेट पोलीस चौकीत लावली जात आहेत. या वाहनधारकांकडून रितसर दंड वसूल केल्यानंतर ही वाहने संबंधितांच्या ताब्यात दिली जात आहेत. सोमवारी देखील ही धडक मोहीम राबविण्यात आली.
सोमवारी परभणी शहरातील स्टेशनरोड, किंग कॉर्नर, जिंतूररोड आणि वसमतरोडवर ही मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात ६० दुचाकी वाहने टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून शहर वाहतूक शाखेत लावण्यात आले. या वाहनधारकांकडून प्रत्येकी ३०० रुपये या प्रमाणे १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. स्टेशनरोड वरील विसावा कॉर्नर भागात स्टेट बँक इंडियाच्या मुख्य शाखेत येणाºया ग्राहकांची वाहने नेहमीच रस्त्यावर उभी असतात. पोलिसांनी सोमवारी येथील वाहनेही उचलून कारवाई केली.
कर्मचाºयांची झाली धावपळ
जिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूक शाखेच्या पथकाने अचानक कारवाई करीत वाहने उचलली व दंड वसूल केल्याने कार्यालयातील कर्मचाºयांची चांगलीच धावपळ उडाली. कोणतीही पूर्व सूचना न देता कारवाई करण्यात आली. चारचाकी वाहनांवर मात्र कारवाई झाली नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार्किंगची व्यवस्था निश्चित नाही. पार्किंग सुविधा नसताना कारवाई केल्यामुळे कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातही उचलली वाहने
वाहतूक शाखेची ही मोहीम शहरातील रस्त्यापर्यंत मर्यादित राहिली नाही. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वाहतूक शाखेचे पथक टोर्इंग व्हॅनसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभी असलेली वाहने टोर्इंग व्हॅनमध्ये टाकून नेण्यात आली. ११ वाहने वाहतूक शाखेच्या कार्यालयात लावण्यात आली. तर इतर वाहनधारकांना जागीच प्रत्येकी ३०० रुपये या प्रमाणे दंड लावण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नो पार्किंगच्या जागेवरच सर्रास वाहने उभी केली जातात. यात कार्यालयातील कर्मचाºयांसह बाहेरहून येणाºया नागरिकांच्या वाहनांचाही समावेश असतो. सोमवारच्या कारवाईत ही सर्व वाहने उचलण्यात आली.
जिल्हाधिकाºयांचे आदेश
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नो पार्किंगच्या जागेवर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसारच ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी दिली.