परभणी : अवैध धंद्याची पोलीस अधिकाऱ्यांना धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:45 AM2019-01-10T00:45:42+5:302019-01-10T00:45:58+5:30
येथील पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैध धंदे आढळून आल्यास किंवा विशेष पथकाच्या कारवाईत प्रकार उघड झाल्यास ठाणे अधिकाºयांवरच पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारवाई होणार आहे. त्यामुळे येथील पोलीस अधिकाºयांनी अवैध धंद्यांची चांगलीच धास्ती घेतली असून पाथरीत अवैध धंदे बंद करण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : येथील पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैध धंदे आढळून आल्यास किंवा विशेष पथकाच्या कारवाईत प्रकार उघड झाल्यास ठाणे अधिकाºयांवरच पोलीस अधीक्षक यांच्याकडून कारवाई होणार आहे. त्यामुळे येथील पोलीस अधिकाºयांनी अवैध धंद्यांची चांगलीच धास्ती घेतली असून पाथरीत अवैध धंदे बंद करण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे.
पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी पाथरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अवैध धंदे पूर्णत: बंद करण्याच्या सूचना ठाणेअमलदार यांना दिल्या आहेत. असे असले तरी चोरी-छुप्या मार्गाने पोलीस अधिकाºयांच्या मूकसंमतीने अवैध धंदे सुरूच होते. पाथरी शहरात मटका, गुटखा आणि इतर अवैध धंदे सुरू असल्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाच्या विशेष पथकाने टाकलेल्या धाडीत उघड झाला होता. याच कारणावरून पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमणवार यांच्याकडील पदभार तातडीने काढून घेण्यात आला होता.
जिल्ह्यात इतर ठिकाणीही अवैध धंंद्याबाबत पोलीस अधिकाºयांना जबाबदार धरले जात आहे. पाथरी पोलीस ठाण्याचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधगिरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेऊन असल्याने पाथरी तालुक्यात अवैध धंद्यावर संक्रात आल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांच्या या भूमिकेमुळे स्थानिक पोलीस अधिकाºयांमध्ये धडकी भरली आहे.