परभणी : पोलीस कर्मचारी रणखांब सेवेतून बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 12:03 AM2019-06-19T00:03:28+5:302019-06-19T00:04:05+5:30
पोलीस खात्याच्या शिस्तीला अनुसरुन कर्तव्य पार पाडले नसल्याच्या कारणावरुन मुख्यालयातील पोलीस शिपाई पांडुरंग नामदेवराव रणखांब यांना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोलीस खात्याच्या शिस्तीला अनुसरुन कर्तव्य पार पाडले नसल्याच्या कारणावरुन मुख्यालयातील पोलीस शिपाई पांडुरंग नामदेवराव रणखांब यांना पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे.
या संदर्र्भात पोलीस अधीक्षकांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पोलीस शिपाई पांडुरंग नामदेव रणखांब यांनी खात्याच्या शिस्तीला अनुसरुन कर्तव्य पार पाडले नाही. कोणताही आर्थिक व्यवहार शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय शासकीय कर्मचाऱ्यास करता येत नाही. रणखांब यांनी असा आर्थिक व्यवहार करुन गुंतवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. शिवाय ते जनतेशी अयोग्यरितीने वागल्याचे आढळले आहे, म्हणून जनता आणि पोलिसांमध्ये चांगले संबंध निर्माण करणे व राखण्याच्या हितार्थ पोलीस नियमावली भाग १ नियम ४४९ मधील (७) च्या निर्देशानुसार त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्या इतपत खात्री झाली आहे. पोलीस खात्याची शिस्त अबाधित रहावी, या अनुषंगाने पांडुरंग रणखांब यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असल्याचे या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.