परभणी:रेझिंग डे निमित्त पोलिसांनी काढली रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 12:28 AM2020-01-09T00:28:14+5:302020-01-09T00:28:42+5:30
पोलीस स्थापना दिनानिमित्त (रेझिंंग डे) पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली़ जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील चार दिवसांपासून रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोलीस स्थापना दिनानिमित्त (रेझिंंग डे) पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली़
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मागील चार दिवसांपासून रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ या अंतर्गत बुधवारी सकाळी शहराच्या प्रमुख मार्गावरून रॅली काढण्यात आली़ या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी तसेच तिन्ही पोलीस ठाण्यांमधील कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते़ सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढण्यात आली़
तत्पूर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात विद्यार्थ्यांना पोलीस दलाविषयी माहिती देण्यात आली़ कार्यक्रमास वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस़पी़ लासीनकर, मुख्याध्यापक बी़ आऱ आव्हाड, पर्यवेक्षक एऩडी़ मालोदे यांची प्रमुख उपस्थिती होती़ सायबर सेलचे गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, प्रशांत वाकळे, दहशतवादविरोधी पथकाचे भारत नलावडे यांनी वाहतुकीचे नियम, दहशतवाद विरोधी कायदा, महिलांची सुरक्षा, पोलीस दलात वापरली जाणारी संगण प्रणाली आदी विषयी मार्गदर्शन केले़
त्यानंतर शहरातून काढलेल्या रॅलीत वसंतराव नाईक विद्यालय, उदेश्वर विद्यालय आदी शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते़ तसेच पोलीस निरीक्षक कुंदन वाघमारे, रामेश्वर तट, प्रदीप पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते़