परभणी : पोलिसांची निवासस्थाने झाली असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:39 AM2018-11-20T00:39:26+5:302018-11-20T00:39:43+5:30
तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा भार स्वत:च्या शिरावर घेणाऱ्या पोलिसांच्या कुटुंंबियांना मात्र असुरक्षित जागेत वास्तव्य करावे लागत आहे. शहरातील पोलीस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली असून हे कुटुंबिय जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असताना निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा भार स्वत:च्या शिरावर घेणाऱ्या पोलिसांच्या कुटुंंबियांना मात्र असुरक्षित जागेत वास्तव्य करावे लागत आहे. शहरातील पोलीस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली असून हे कुटुंबिय जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असताना निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
उन्हाळा असो की पावसाळा; कशाचीही तमा न बाळगता २४ तास कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कुटुंबापासून दूर राहत डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस कर्तव्य बजावणाºया पोलीस कर्मचाºयांचे कुटुंबिय मात्र असुरक्षित छताखाली राहत आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत पोलीस कर्मचाºयांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ ३० वर्षांपूर्वी वसाहत निर्माण करण्यात आली; परंतु, या वसाहतीची नियमित दुरुस्ती झाली नसल्याने सध्या निवासस्थांची दुरवस्था झाली आहे.
घरांच्या छताला गळती लागली असून फरशी ठिकठिकाणी उखडली आहे. खिडक्यांची तावदाने, घरांवरील पत्रे तुटल्याने पावसाळ्यात या घरांमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचते. सांडपाणी वाहूून नेणाºया नाल्या मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने घरासमोरच पाणी साचते. परिणामी पावसाळ्यामध्ये घराच्या बाहेर पडणे अवघड होते. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा सांभाळणाºया पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबियांना मात्र सुरक्षेसाठी पत्र्याच्या शेडचा आधार घ्यावा लागत आहे. ड्रेनेजची सुविधा नसल्याने सांडपाणी वसाहतीमध्ये तुंबून राहते. हेच पाणी जलवाहिनीतही मिसळते. त्यामुळे पोलीस वसाहतीत राहणाºया कर्र्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संरक्षक भिंत कोसळली
या वसाहतीला चारही बाजूंनी संरक्षित भिंत बांधली आहे. शनिवार बाजार परिसरात ही संरक्षक भिंत कोसळली आहे. तर वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेले फाटक तुटल्याने मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. तसेच बाजारासाठी आलेले नागरिक या भागात अस्वच्छता करतात. संरक्षित भिंत बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला; परंतु, उपयोग झाला नाही. त्यामुळे कर्मचाºयांनी स्वखर्र्चाने लोखंडी फाटक बसवून घेतले आहे. भिंत कोसळलेल्या भागात तात्पुरती डागडुजी करण्यात आली. संरक्षक भिंत बांधून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही बांंधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.