परभणी :बेसुमार वाळू उपश्याने दुधना नदीपात्रात खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:11 AM2019-06-13T00:11:45+5:302019-06-13T00:11:52+5:30
वाळूमाफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने दुधना नदीपात्राच्या काजळी रोहिणा शिवारात मोठमोठे खड्डे पडले असून, दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्याने हे खड्डे पाण्याने भरले आहेत. दुधना नदीपात्रात सर्वत्र पाण्याचे डोह निर्माण झाले आहेत.
परभणी :बेसुमार वाळू उपश्याने दुधना नदीपात्रात खड्डे
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : वाळूमाफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने दुधना नदीपात्राच्या काजळी रोहिणा शिवारात मोठमोठे खड्डे पडले असून, दुधना प्रकल्पातून पाणी सोडल्याने हे खड्डे पाण्याने भरले आहेत. दुधना नदीपात्रात सर्वत्र पाण्याचे डोह निर्माण झाले आहेत.
दुधना नदीच्या काजळी रोहिणा ेयेथील वाळू धक्क्याचा लिलाव झाला होता. त्यानंतर संबंधित निविदाधारकाने हजारो ब्रास वाळूचे उत्खनन केले. परिणामी नदीपात्रात सर्वत्र खड्डे पडले. दुधना नदीकाठावरील गावांसाठी व परभणी, पूर्णा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी १ जून रोजी निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.
वाळूमुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. काजळी रोहिणा शिवारातील शेतकऱ्यांना नदीपात्र ओलांडून शेतीची मशागत करण्यासाठी जावे लागते. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी मशागतीत व्यस्त आहेत. नदीपात्रातील खड्ड्यात पाणी साचल्याने नदी ओलांडून शेतीसाठी लागणारे साहित्य, औजारे, खत व जनावरे घेऊन जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
रोहिणा येथील वाळू धक्क्याच्या लिलावापूर्वी वाळूमाफियांनी अवैध वाळू उपसा केला होता. त्यानंतर वाळू धक्क्याचा रितसर लिलाव झाला; परंतु, संबंधित निविदाधारकाने प्रमाणापेक्षा अधिक वाळू उपसा केल्याने नदीपात्रात १० ते १५ फुटापर्यंत खड्डे पडल्याचा आरोप रोहिणा येथील शेतकऱ्यांनी केला आहे. या खड्ड्यांमुळे मागील आठवड्यात बैलाला पाणी पाजण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे नदीपात्रातील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. दरम्यान, पावसाळ्यात नदीपात्राच्या खड्ड्यात आणखी पाणी साचणार आहे. त्यामुळे नदी ओलांडून शेताकडे जाणे अवघड होणार आहे. वाळूच्या वाहतुकीमुळे नदीपात्राशेजारील गावच्या रस्त्यांची दुरवस्था होत आहे. तसेच पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
नदीपात्र बनले धोकादायक
४राजा, काजळी रोहिणा, गोगलगाव आदी गावच्या शिवारातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा झाला.
४रोहिणा येथे क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसली असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. त्यामुळे टेंडरधारक मालमाल झाले असल्याचे दिसत आहे.
४वाळूचे भावही गगणाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम करणे कठीण झाले आहे. यामुळे वाळू चोरांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामस्थांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन वाळू अवैध उपसा सुरूच
च्काजळी रोहिणा शिवारातील दुधना नदीपात्रात वाळूचा बेसुमार उपसा झाल्याने दुधना पात्र खड्डेमय झाले आहे. सद्यस्थितीत या खड्ड्यात पाणी असल्याने शेतकºयांना पात्र ओलांडून शेती औजारे नेणे अवघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने स्थळ पाहणी पंचनामा करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. शेतकºयांना रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाºयांना दिले आहे.
च्नदीपात्रातील खड्ड्यात पाणी साचले असतानाही रोहिणा शिवारातून वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. अधिकाºयांची नजर चुकवून रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतूक केली जात आहे. दुधना नदीपात्र खड्डेमय झाल्याने प्रकल्पातून सोडलेले पाणी टेलपर्यंत पोहचण्यासाठी कसरत करावी लागत आहे. वाळूच्या अवैध उपशाला प्रशासनाने प्रतिबंध घालावा, अशी मागणी होत आहे.