परभणी :२२० एकर जमीन केंद्राच्या ताब्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 12:27 AM2018-01-17T00:27:18+5:302018-01-17T00:27:24+5:30

कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराजवळून जाणाºया वळण रस्त्यासाठी गाव आणि शेतकºयांच्या नावांसह थ्री डी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या अंतर्गत बाह्य वळण रस्त्यासाठी संपादित करावयाची परभणी तालुक्यातील पाच गावांतील सुमारे २२० एकर जमीन अप्रत्यक्षरीत्या केंद्र शासनाच्या ताब्यात आल्याने लवकरच बाह्यवळण रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.

Parbhani: In possession of 220 acres of land? | परभणी :२२० एकर जमीन केंद्राच्या ताब्यात?

परभणी :२२० एकर जमीन केंद्राच्या ताब्यात?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराजवळून जाणाºया वळण रस्त्यासाठी गाव आणि शेतकºयांच्या नावांसह थ्री डी अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. या अंतर्गत बाह्य वळण रस्त्यासाठी संपादित करावयाची परभणी तालुक्यातील पाच गावांतील सुमारे २२० एकर जमीन अप्रत्यक्षरीत्या केंद्र शासनाच्या ताब्यात आल्याने लवकरच बाह्यवळण रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे.
कल्याण ते निर्मल या २२२ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहरालगत १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता तयार केला जाणार आहे. सध्या पाथरी आणि मानवत तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. परभणीे शहर वळगता वसमत ते नांदेडपर्यंत कामाला प्रारंभही झाला आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गाला परभणी शहराबाहेरुन वळण रस्ता काढण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यासाठी जमीन संपादित करण्याची प्रक्रिया दोन वर्षापासून सुरु आहे. विशेष म्हणजे, या जमिनीचे मोजणीचे कामच दोन वेळा झाले. एक वेळा थ्री ए अधिसूचनाही रद्द झाली होती. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये या अधिसूचनेची पूर्नप्रसिद्धी करण्यात आली. संबंधित शेतमालकांच्या हरकती मागवून त्यावर सूचनावणी झाली आणि थ्री ए अधिसूचना पूर्ण करुन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठविला होता. परंतु, थ्री डी अधिसूचना प्रकाशित होण्यासही विलंब लागत होता. ही बाब लक्षात घेऊन खा. बंडू जाधव यांनी केंद्रीय रस्ते व दळण वळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. अखेर नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या प्रबंधक महासंचालकांनी या प्रकरणी गतीने कारवाई करीत या रस्त्याची अधिसूचना भारतीय राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.
परभणी शहराबाहेरुन जाणाºया बाह्य वळण रस्त्याची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने आता रस्ता तयार करण्याच्या कामातील ८० टक्के अडथळे दूर झाले आहेत.
खा. बंडू जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून बाह्यवळण रस्त्यासाठी संपादित करावयाची २२० एकर जमीन अप्रत्यक्षरीत्या केंद्र शासनाच्या ताब्यात आली आहे. त्यामुळे कामाला गती येईल, अशी आशा आहे.
असा आहे बाह्यवळण रस्ता
४परभणी शहरापासून साधारणत: ६ कि.मी. अंतरावर पाथरी रस्त्यावरील सरस्वती डेंटल कॉलेजपासून बाह्य वळण रस्त्याला सुरुवात होणार आहे. जिंतूररोड ओलांडून हा रस्ता पुढे वसमत रोडवरील असोला पाटीजवळ निघणार आहे. पारवा, धर्मापुरी, परभणी आणि वांगी या गावांच्या शिवारातील सुमारे २२० एकर जमीन या रस्त्यासाठी संपादित केली जाणार आहे. १४.५ कि.मी. अंतराचा हा बाह्य वळण रस्ता असेल, अशी माहिती शिवसेनेचे प्रवीण देशमुख यांनी दिली.
पथदिव्यांचा प्रश्न मार्गी लावा
४राष्ट्रीय महामार्गाला बाह्य वळण रस्ता निर्माण होणार असला तरी परभणी शहरातून जाणारा वसमत रस्ताही राष्ट्रीय महामार्गाचाच भाग आहे. मात्र या रस्त्यावर पथदिव्यांची सुविधा नसल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ते दत्तधाम या रस्त्यावर एलईडी पथदिवे बसविण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. जिल्हा विकास निधीतून या पथदिव्यांसाठी निधी उपलब्ध झाल्यास महामार्ग उजळून निघणार आहे.

Web Title: Parbhani: In possession of 220 acres of land?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.