परभणी : पालम तालुक्यात वृक्षांची बेसुमार कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:46 PM2019-04-23T23:46:46+5:302019-04-23T23:48:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पालम ( परभणी ): तालुक्यात मागील काही दिवसांपासून वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे़ वन विभागाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): तालुक्यात मागील काही दिवसांपासून वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे़ वन विभागाचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असून, कारवाई करण्याऐवजी कर्मचारी वृक्षतोड करणाऱ्यांना अभय देत आहेत़ त्यामुळे शासकीय यंत्रणेचा कसलाही अंकुश वृक्ष तोड करणाऱ्यांवर राहिलेला नाही़
पालम तालुक्यात यावर्षी दुष्काळाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ कमी पाऊस पडल्याने शेतकºयांचा खरीप व रबी दोन्ही हंगाम हातचे गेले असून, जागोजागी रानं मोकळी झाली आहेत़ याचाच फायदा घेत शिवारातील झाडांची कत्तल वाढली आहे़
शासकीय यंत्रणा जून महिना येताच वृक्ष लागवडीचा गाजावाजा मोठ्या थाटामाटात करते़ मात्र उन्हाळ्यात मात्र वृक्षतोड होत असताना त्याकडे कानाडोळा करीत आहे़ म्हणून बनवस येथील घटना ही अशाच वृक्षतोडीतून घडली होती़ पालम तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकºयांच्या बांधावरील शेतातील झाडे तोडण्यासाठी लाकूडतोड्यांची यंत्रणा सक्रिय झालेली आहे़ शेतकºयांकडून कमी किमतीत झाडे विकत घेऊन त्याची तोड केली जात आहे़ विशेषत: ही झाडे तोडण्याची माहिती वन विभागाच्या कर्मचाºयांना असूनही संबंधित कर्मचारी याकडे पाठ फिरवत आहेत़ पालम तालुक्यात वृक्षतोडीवर अंकुश ठेवण्याऐवजी वृक्ष तोडणाºया लोकांकडून वसुली करण्यातच कर्मचारी मशगुल झाले आहेत़ वृक्षतोडीची तक्रार करूनही दुर्लक्ष केले जाते़ तसेच तक्रारदारांना दमदाटी केली जात असून, दिवसेंदिवस वृक्षतोडीच्या प्रमाणात वाढ होत आहे़ यामुळे पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक असलेले वृक्ष तोडले जात असल्याने अनेक गावचे शिवार उजाड झाले आहेत़ तालुक्यातील वृक्षतोडीची तातडीने चौकशी करून वन विभागाच्या दोषी कर्मचाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जि़प़ सदस्य पार्वतीताई वाघमारे, शंकर वाघमारे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
लाकूडतोड्यांना वन विभागाचे अभय
४पालम तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या आहेत़ या वीटभट्ट्यांना दररोज शेकडो टन लाकूड लागत असते़ त्यामुळे तालुक्यात वृक्षतोडीचा व्यवसाय तेजीत आहे़ वन विभागाच्या कर्मचाºयांचे वृक्षतोड करणाºयांशी अर्थपूर्ण संबंध आहे. त्यामुळे वृक्षतोड करताना कसली भीती बाळगली जात नाही़, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. उलट वनविभागाचे कर्मचारी तक्रारदारांनाच धमकावत असल्याने अनेक जण तक्रार करताना हात आखडता घेत आहेत. परिणामी तालुक्यात राजरोसपणे वृक्षांची बेसुमार कत्तल केली जात आहे़
पालम शहरातून लाकडाची वाहतूक
ग्रामीण भागातील तोडलेल्या लाकडांची दिवसभर पालम शहरातून बिनधास्तपणे वाहतूक केली जात आहे़ अनेकदा लाकडे भरून आलेल्या वाहनांच्या पाठीमागे शासकीय योजनेतील बड्या अधिकाºयांच्या वाहनांचा ताफा उभा असतो़; परंतु, अधिकारी मात्र याकडे डोळेझाक करीत आहेत़ त्यामुळे वृक्षतोड करणाºयांना कोणीचीही भीती राहिलेली नाही़