परभणी : संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्व तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 11:49 PM2019-08-13T23:49:54+5:302019-08-13T23:50:56+5:30

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्यानंतर पूरपरिस्थती निर्माण झालीच तर करावयाच्या उपाययोजनांची तयारी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. या अंतर्गत गोदावरी नदीकाठावरील तहसील कार्यालयात रेस्क्यू बोट सज्ज ठेवण्यात आल्या असून, या बोटींची चाचणीही बुधवारी घेण्यात आली.

Parbhani: Preparation begins to deal with possible floods | परभणी : संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्व तयारी सुरू

परभणी : संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्व तयारी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडल्यानंतर पूरपरिस्थती निर्माण झालीच तर करावयाच्या उपाययोजनांची तयारी येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाने केली आहे. या अंतर्गत गोदावरी नदीकाठावरील तहसील कार्यालयात रेस्क्यू बोट सज्ज ठेवण्यात आल्या असून, या बोटींची चाचणीही बुधवारी घेण्यात आली.
जायकवाडी प्रकल्पातून डाव्या कालव्यात ४०० क्यूसेस, उजव्या कावल्यात ९०० क्यूसेस पाणी सोडले जात आहे. त्याचप्रमाणे गोदावरी नदी पात्रात १५८९ क्यूसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे. साधारणत: दोन दिवसांत हे पाणी परभणी जिल्ह्यात दाखल होईल. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, पूर परिस्थिती निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्ज ठेवल्या आहेत. या विभागाकडे चार रेस्क्यू बोट उपलब्ध आहेत. गोदावरी नदीकाठ असलेल्या पूर्णा, पाथरी, सोनपेठ आणि गंगाखेड येथील तहसील कार्यालय किंवा नगरपालिकेत या बोट सज्ज ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे ९० लाईफ सेव्हींग जॅकेट, आस्का कंपनीचा लॅम्प, प्रत्येक तालुक्यासाठी १ मेगा फोन, ५०० फूट लांबीची दोरी, फ्लोटींग पंप, कटर आदी साहित्य सज्ज ठेवण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यात पाथरी, पूर्णा, सोनपेठ, गंगाखेड, पालम या पाच तालुक्यात सुमारे १४० कि.मी. गोदावरी नदीचा प्रवाह आहे. तसेच गोदावरी नदी काठावर सुमारे २०० गावे असून, या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
८८ गावांना होऊ शकतो पुराचा धोका
४जिल्ह्यातील गोदावरी नदी काठावरील ८८ गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन या गावांमध्ये दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना गावात थांबणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोनपेठ तालुक्यात १६, पाथरी २२, पालम १६, परभणी ४, मानवत ५, पूर्णा १० आणि गंगाखेड तालक्यात अशी १५ गावे आहेत.
तलवात घेतले प्रात्यक्षिक
४सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील अग्नीमशन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १३ आॅगस्ट रोजी रेस्क्यू बोटीचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. सोनपेठ तालुक्यातील १६ गावे गोदावरी नदीच्या काठावर आहेत.
४भविष्यात पूर परिस्थिती निर्माण झाीच तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी सायखेडा येथील तलावात मंगळवारी प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार साहेबराव घोडके, मंडळ अधिकारी विलास वाणी, साहेबराव जाधव, इस्माईल शेख, रफीक भाई, दिनेश सरोदे यांच्यासह तलाठी, मंडळ अधिकारी, कर्मचार उपस्थित होते.

Web Title: Parbhani: Preparation begins to deal with possible floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.