परभणी ; ग्रामपंचायतीसमोर केली अंत्यसंस्काराची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:54 AM2018-12-15T00:54:36+5:302018-12-15T00:54:49+5:30
स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अत्यंविधी उरकण्याची तयारी केल्याने गावात तणाव निर्माण झाला; परंतु, तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढून जागा उपलब्ध देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावातील तणाव निवळल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अत्यंविधी उरकण्याची तयारी केल्याने गावात तणाव निर्माण झाला; परंतु, तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढून जागा उपलब्ध देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावातील तणाव निवळल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथे घडली.
तालुक्यातील रामेटाकळी येथील मातंग समाजातील लक्ष्मण नवगिरे यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी १४ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले. गावात मातंग समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहे.
गावातून या ठिकाणी जाण्यासाठी एक कि.मी.चे अंतर शेतकऱ्यांना कापावे लागते. मात्र स्मशानभूमीकडे जाणाºया रस्त्यावर लघूसिंचन विभागाने बंधारा बांधला आहे. या बंधाºयात पाणी आल्याने स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता शिल्लक नाही. त्यामुळे वारंवार मागणी करूनही रस्ता होत नसल्याने मातंग समाजाने शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेत गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली. यासाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायत कार्यालयासमोर टाकण्यात आले. याची माहिती मिळताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली. तसेच लालसेनेचे गणपत भिसे, अशोक उफाडे, किशोर कांबळे, कोंडिबा जाधव हे ही गावात दाखल झाले. त्यानंतर सकाळी ११ वाजता तहसीलदार डी.डी. फुफाटे, नायब तहसीलदार नकूल वाघुंडे, पोलीस निरीक्षक मीना कर्डक पोलिसांच्या ताफ्यासह गावात दाखल झाल्या. स्मशानभूमीत जाणाºया रस्त्याची पाहणी करून मयत लक्ष्मण नवगिरे यांच्या घरी भेट दिली. यावेळी स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने समाजाला दुसरी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. तहसीलदार फुफाटे यांनी १८ डिसेंबरच्या ग्रामसभेत ठराव घेऊन नवीन जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक व समाजबांधवांनी गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी सहमती दिली. दुपारी दोन वाजता तहसीलदार व पोलिसांच्या उपस्थितीत लक्ष्मण नवगिरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.