परभणी : लोकसभा निवडणुकीची राजकीय पक्षांकडून तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:24 AM2019-01-02T00:24:10+5:302019-01-02T00:25:05+5:30

लोकसभा निवडणूक चार महिन्यानंतर होणार असली तरी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीची प्रत्यक्ष तयारी चालविली आहे. त्यानुसार उमेदवार निश्चितीच्या दृष्टीकोनातून या पक्षांची पाऊले पडू लागली आहेत.

Parbhani: Preparations from the political parties of the Lok Sabha elections | परभणी : लोकसभा निवडणुकीची राजकीय पक्षांकडून तयारी

परभणी : लोकसभा निवडणुकीची राजकीय पक्षांकडून तयारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकसभा निवडणूक चार महिन्यानंतर होणार असली तरी जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांनी या निवडणुकीची प्रत्यक्ष तयारी चालविली आहे. त्यानुसार उमेदवार निश्चितीच्या दृष्टीकोनातून या पक्षांची पाऊले पडू लागली आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिल महिन्यात मतदान होणार आहे. ७ ते ८ मार्च रोजी या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार असल्याची राजकीय वर्तूळातून चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडूनही या निवडणुकीची तयारी केली जात आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपानुसार परभणीची जागा सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून आतापर्यंत चार वेळा या संदर्भात बैठका घेण्यात आल्या. आता ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मुंबई येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार हे स्वत: या संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीत लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित होणार असल्याची चर्चा पक्षाच्या जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमधून होत आहे. या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांच्यासह विविध पदाधिकारी मंगळवारी मुंबईला रवाना झाले.
दुसरीकडे मंगळवारीच मुंबईत भाजपामध्येही परभणी लोकसभेच्या अनुषंगाने घडामोडी घडल्या. दुपारी २ वाजता मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या जिल्ह्यातील पदाधिकाºयांची जवळपास अर्धातास बैठक घेऊन याबाबतचा आढावा घेतला. त्यावेळी माजी आ.विजय गव्हाणे यांनी, परभणी लोकसभा मतदार संघातून भाजपा निवडणूक लढविण्यास सक्षम आहे. परभणी, गंगाखेड, परतूर व घनसावंगी या चार तालुक्यांमध्ये पक्षाची ताकद मोठी आहे. शिवाय १९९० पूर्वी परभणीची जागा भाजपाकडेच होती. त्यावेळी निवडलेल्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतल्याने ही जागा शिवसेनेकडे गेली होती. आता पुन्हा ती भाजपाकडे घ्यावी, अशी मागणी केली. शिवसेनेचेसोबत युती झाली नाही तरी भाजपाकडे सक्षम उमेदवार आहेत. तिरंगी लढत झाल्यास शिवसेना तिसºया क्रमांकावर राहील. राष्ट्रवादी व भाजपातच खरी लढत होईल, असे माजी आ.गव्हाणे म्हणाले. याला महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गणेश रोकडे यांनीही होकार दिला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीची तयारी सुरु करा, राज्य व केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा, सर्व मतदारसंघ पिंजून काढा, असे आदेश दिले. यावेळी येत्या काही दिवसांमध्ये पक्षाचा मेळावा परभणीत घेण्यात येणार आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याची विनंती भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाच्या वतीनेही परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तीनवेळा चर्चा झाल्या आहेत. जिल्ह्यातील पक्षाचे चार नेते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत; परंतु, राष्ट्रवादीच्या तुलनेत कॉंग्रेसची ताकद कमी आहे. शिवाय तगड्या उमेदवारांचीही वाणवा आहे. त्यामुळे परभणीची जागा राष्ट्रवादीकडेच राहू देण्याचा पक्षाच्या नेत्यांचा कल असल्याचे कॉंग्रेसच्या एका नेत्याने ‘लोकमत’शीे बोलताना सांगितले.

Web Title: Parbhani: Preparations from the political parties of the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.