परभणी : लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:55 PM2018-11-24T23:55:19+5:302018-11-24T23:56:21+5:30
गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय उपक्रमांअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेची जिल्ह्यातील आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, ५ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय उपक्रमांअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेची जिल्ह्यातील आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली असून, ५ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे़
देशभरात गोवर, रुबेला आजाराच्या लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे़ त्या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील आरोग्य विभागानेही मोहिमेची तयारी केली आहे़ शनिवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मोहिमेच्या तयारीची माहिती देण्यात आली़ यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़जावेद अथर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ खंदारे, महापालिकेच्या उपायुक्त डॉ़ विद्याताई गायकवाड, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ़ किशोर सुरवसे, डॉ़आरती देऊळकर, शिक्षणाधिकारी आशा गरुड, डॉ़ राजगोपाल कालानी आदींची उपस्थिती होती़
परभणी जिल्ह्यामध्ये २७ नोव्हेंबरपासून या मोहिमेला सुरुवात होणार असून, ४५ दिवस मोहीम चालणार आहे़ ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ५ लाख १३ हजार २० बालकांचा लस टोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे़ त्यामध्ये ग्रामीण भागात ३ लाख २ हजार ४६७, शहरी भागात १ लाख १६ हजार ११७ आणि मनपा हद्दीमध्ये ९४ हजार ४३६ बालके आहेत़ लसीकरणासाठी प्रत्येक कर्मचाºयाला प्रशिक्षण देण्यात आले आहे़ जिल्ह्यामध्ये पुरेसा लसीचा साठा उपलब्ध झाला आहे़ लहान मुलांमधील आजारांना आळा घालण्यासाठी लसीकरण हे सुरक्षित व सर्वात प्रभावी माध्यम आह़े़ भविष्यात होणारे रोगही लसीकरणामुळे टाळले जातात़ बालकांना रोगांपासून संरक्षण प्राप्त व्हावे, बालकांचे आरोग्य सुधारून ते सुदृढ व्हावेत़ बालकांमधील बौद्धिक, शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने ही लसीकरण मोहीम राबविली जाते़ गोवर, रुबेला लसीकरणानंतर बालकांना या आजारापासून संरक्षण मिळणार आहे़ रुबेला हा सौम्य संसर्गजन्य आजार असून, लसीकरणाद्वारे त्यावर प्रतिबंध मिळविता येतो़
गोवर, रुबेला लसीकरणासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागाने मागील दोन महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे़ जिल्हाभरात जनजागृती करणे, लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाºयांचे प्रशिक्षण आदी बाबी पूर्ण झाल्या आहेत़ प्रशासनातर्फे जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या चार बैठका पार पडल्या़ तसेच दोन कार्यशाळा, शिक्षण विभागातील दोन कार्यशाळा, महिला कल्याण विभाग, दंत वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग स्कूल, आयएमए, आयएपी, रोटरी क्लब, खाजगी अवैद्यकीय प्रतिनिधी आदींच्या कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत़ तसेच तालुका समन्वय समिती, कोअर कमिटी, मुख्याध्यापक, नोडल अधिकाºयांची बैठक, पालक व शिक्षकांच्या सभा आदी माध्यमातून जनजागरण करण्यात आले़ जिल्हाभरात १३३८ प्रभातफेºयाही काढण्यात आल्या आहेत़ एकंदर जिल्हा आरोग्य विभागाने लसीकरण मोहिमेची संपूर्ण तयारी केली असून, उद्दिष्ट साध्य करून या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली़
प्रशिक्षित कर्मचाºयांमार्फत लसीकरण
शाळा, अंगणवाडी, रेल्वेस्टेशन, वैद्यकीय महाविद्यालये इ. ठिकाणी हे लसीकरण केले जाणार आहे़ लसीकरणासाठी ४०९ लस टोचकांची नियुक्ती करण्यात आली असून, या कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ या कर्मचाºयांच्या माध्यमातूनच लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे़ जिल्हाभरात ४ हजार २९३ केंद्रांवर हे लसीकरण केले जाणार असून, जिल्ह्यातील २ हजार १६ शाळांमधूनही लसीकरण केले जाणार आहे़
आपतकालीन : किटचीही व्यवस्था
४लसीकरण मोहिमेदरम्यान एईएफआय हे आपतकालीन कीटही प्रत्येक केंद्रांवर ठेवण्यात आले आहे़ किटमधील इमर्जन्सी इंजेक्शन वापरण्यासंदर्भात जिल्हास्तरावर सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाºयांना १९ नोव्हेंबर रोजी आणि तालुकास्तरावर २० व २२ नोव्हेंबर सर्व आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़
४लसीकरण मोहीमेत काही प्रतिकूल घटना घडलीच तर प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तर आणि जिल्हास्तरावर एईएफआय केंद्र स्थापन करण्यात आले आहे़ प्रतिकूल घटना घडल्यानंतर बालकांना उपचारासाठी नेण्यासाठी १०८ व १०२ क्रमांकांची वाहने उपलब्ध केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़