परभणी : करांमध्ये वाढ न करता ५७६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:32 PM2020-02-29T22:32:27+5:302020-02-29T22:32:54+5:30

येत्या आर्थिक वर्षात ५७६ कोटी रुपयांचा आर्थिक ताळेबंद बांधत शनिवारी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. येत्या वर्षात कोणत्याही करांमध्ये वाढ करण्यात आली नसली तर मिळालेल्या उत्पन्नातून शिक्षण, आरोग्य, क्रीडा या घटकांबरोबरच पर्यटनविकासाची कामे करुन आर्थिक स्त्रोत वाढविण्याच्या कामांवर भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

Parbhani: Presenting a budget of 2 crores without raising taxes | परभणी : करांमध्ये वाढ न करता ५७६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

परभणी : करांमध्ये वाढ न करता ५७६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: येत्या आर्थिक वर्षात ५७६ कोटी रुपयांचा आर्थिक ताळेबंद बांधत शनिवारी महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. येत्या वर्षात कोणत्याही करांमध्ये वाढ करण्यात आली नसली तर मिळालेल्या उत्पन्नातून शिक्षण, आरोग्य, क्रीडा या घटकांबरोबरच पर्यटनविकासाची कामे करुन आर्थिक स्त्रोत वाढविण्याच्या कामांवर भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.
येथील बी.रघुनाथ सभागृहात शनिवारी दुपारी ३ वाजता स्थायी समितीचे सभापती गुलमीर खान यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेला प्रारंभ झाला. याप्रसंगी आयुक्त रमेश पवार, उपायुक्त गणपत जाधव, नगरसचिव रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती. सभापती गुलमीर खान यांनी प्रस्तावित केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदी घोषित केल्या. २०१९-२० मध्ये ५४० कोटी ८२ लाख रुपये मनपाकडे जमा होते. त्यापैकी ५४० कोटी ६ लाख रुपयांचा खर्च झाला असून, ७५ लाख ५८ हजार रुपये शिल्लक आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षत मनपाला १५० कोटी ४१ लाख रुपये महसुली जमा होणार असून, २७२ कोटी १२ लाख रुपये भांडवली जमा होण्याची शक्यता आहे. त्यातून एकत्रित ५७६ कोटी ७६ लाख रुपये येत्या आर्थिक वर्षात उत्पन्न प्राप्त होईल. त्यात महसुली खर्च ७९ कोटी ९२ लाख पये, भांडवली खर्च २४३ कोटी ४८ लाख प्रस्तावित करण्यात आला असून एकूण ४०२ कोटी ३४ लाख रुपयांच्या खर्चाची तरतूद करीत १७४ कोटी ४१ लाख रुपये शिलकीचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
प्राप्त झालेल्या आर्थिक तरतुदीत नागरी दलित वस्ती सुधार योजनेवर ११ कोटी, खासदार क्षेत्रिय विकास कार्यक्रम १ कोटी, नाविण्यपूर्ण योजनेतून नाना-नानी गार्ड, शिवाजी उद्यानाच्या विकासासाठी २ कोटी, स्ट्रीट लाईटसाठी १ कोटी, पाणीपुरवठा योजनेसाठी १५ कोटी, दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यास पाणीपुरवठ्यासाठी ५० लाख, नाट्यगृह विकासाठी २२ कोटी, अल्पसंख्यांक बहुल विकास क्षेत्रासाठी १ कोटी, घरकुल योजनेसाठी १० कोटी, अमृत योजनेसाठी ६५ कोटी, इनडोअर अ‍ॅम्पी थिएटर व लाईट अ‍ॅण्ड लेझर शोसाठी २ कोटी, मनपा रुग्णालयासाठी ४ कोटी ५० लाख, आंतररुग्णालयासाठी ४० लाख आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवीन कोंडवाडा बांधणे, जलतरिणेकेचे नूतनीकरण, खेळाचे मैदान विकसित करणे, उद्यान साहित्याची खरेदी, विपश्यना केंद्र, हज हाऊस, वारकरी निवासस्थानासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे. १७४ कोटी ४१लाख रुपये शिलकी अर्थसंकल्पास शनिवारच्या सभेत मंजुरी देण्यात आली.
सुविधांबरोबरच शहराला वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न
४२०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर करताना आयुक्त रमेश पवार यांनी आतापर्यंत शहरात केलेल्या कामांची माहिती दिली. ते म्हणाले, पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, मनपातील कारभार संगणकीकृत करण्याचे प्रयत्न झाले. शहरात सुविधा देण्याचाही आतापर्यंत प्रयत्न केला. पुढील अर्थसंकल्पात सुविधांबरोबरच शहराला नवी ओळख प्राप्त व्हावी, अशी कामे केली जाणार आहेत. त्यासाठी पर्यटनाच्या दृष्टीने लाऊट अ‍ॅण्ड साऊंड शो उभारण्यात येणार आहे. तसेच स्थानिक कलाकारांसाठी अम्पी थिएटर तयार करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त रमेश पवार यांनी दिली.
मनपाच्या शाळांसाठी ५० लाख
४महानगरपालिकेच्या शाळांनाही वेगळी ओळख निर्माण करुन देण्यासाठी येत्या वर्षात भरीव तरतूद केली आहे. मनपाकडे ६ शाळा असून प्रत्येक शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे परभणी शहरात ६५० दिव्यांग असून, या दिव्यांगांसाठी पुढील वर्षात किमान १०० स्टॉल्स उपलब्ध करुन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. याशिवाय स्केटींग ग्राऊंडचा विकास, मनपाच्या जमिनींचा विकास करणे, व्यापारी संकुलाच्या माध्यमातून मनपाचे आर्थिक स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न पुढील आर्थिक वर्षात केला जाणार आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे-रमेश पवार
४महानगरपालिकेने या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणत्याही करवाढीचा बोझा न टाकता शहर विकासाचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपल्याकडील कराची थकबाकी भरुन मनपाला सहकार्य केले तर शहराला विकासाच्या दिशेने नेणे सोपे होणार आहे. तेव्हा नागरिकांनी वेळेत आपला कर जमा करुन मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त रमेश पवार यांनी यावेळी केले.

Web Title: Parbhani: Presenting a budget of 2 crores without raising taxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.