परभणी : मानवतमध्ये हळदीला ६२७५ रुपयांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:34 AM2019-05-09T00:34:42+5:302019-05-09T00:35:31+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या लिलावामध्ये पहिल्याच दिवशी हळदीला ६२७५ रुपये भाव मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर सुरू केलेल्या लिलावामध्ये पहिल्याच दिवशी हळदीला ६२७५ रुपये भाव मिळाला आहे.
मानवत तालुक्यातील हळद उत्पादकांची गैरसोय लक्षात घेऊन मानवत बाजार समितीत हळदीचा लिलाव करण्याचा निर्णय सभापती गंगाधरराव कदम यांनी घेतला होता. त्यानुसार ७ मे रोजी लिलाव प्रक्रिया करण्यात आली. राजाराम मोरे यांच्या आडतीमध्ये हळदीला सर्वाधिक ६२७५ रुपये वरचा प्रती क्विंंटल भाव मिळाला. यावेळी हळद विक्रीस आणणाऱ्या शिवाजी झाकणे, संजय गिरी, भागवत राठोड, रामप्रसाद चापके, कल्याणराव सवणे, राजाभाऊ कदम या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभापती गंगाधरराव कदम, उपसभापती पंकज आंबेगावकर, जे.बी. भालेराव, माणिकराव काळे, बाबासाहेब अवचार, बाळासाहेब मोरे, सोपानराव वाघमारे, अनंत गोलाईत, गिरीष कत्रुवार, श्रीकिशन सारडा, राजाराम मोरे, संजय लड्डा, आश्रोबा कुºहाडे, संजय यादव, महेश कोक्कर आदींची उपस्थिती होती. पहिल्याच दिवशी १ हजार क्विंंटल हळदीची आवक झाली. लिलावाद्वारे हळद खरेदी करण्यासाठी वसमत येथील लक्ष्मीनारायण मुरक्या, नितीन लोहट, सुरेंद्र तोष्णीवाल, राहुल कडतन, जुगलकिशोर काबरा, राजू काबरा हे खरेदीदार सहभागी झाले होते.
ताडकळसमध्ये : २०० क्विंंटल खरेदी
४ताडकळस- पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ७ मे रोजी पहिल्याच दिवशी जाहीर लिलावाद्वारे २०० क्विंटल हळदीची खरेदी करण्यात आली. या ठिकाणी हळदीला ६१०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
४यावेळी नरहरी रुद्रवार, नंदू मुंदडा, रुस्तूम अंबोरे, निळू पाटील, केरबा लाकडे, बालाजी अंबोरे यांची उपस्थिती होती. ताडकळस परिसरातील शेतकºयांनी हळद विक्रीसाठी कृऊबाच्या मार्केट यार्डात आणण्याचे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळाने केले आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात यावर्षी हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्याने जाहीर लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.