परभणी : बनावट आॅईल उत्पादनाच्या कारखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:34 AM2019-03-05T00:34:55+5:302019-03-05T00:35:22+5:30

दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी लागणारे आॅईल विना परवाना तयार करणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. या प्रकरणात वरिष्ठांच्या आदेशावरुन ३ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला आहे.

Parbhani: Print Texture On Oil Production Factory | परभणी : बनावट आॅईल उत्पादनाच्या कारखान्यावर छापा

परभणी : बनावट आॅईल उत्पादनाच्या कारखान्यावर छापा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी लागणारे आॅईल विना परवाना तयार करणाऱ्या एका कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. या प्रकरणात वरिष्ठांच्या आदेशावरुन ३ मार्च रोजी गुन्हा नोंद झाला आहे.
या संदर्भात पोेलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी- शहरातील नागसेननगर येथे विना परवाना आॅईल तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्याविषयी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी छापा टाकण्यात आला. त्यावेळी कारखान्याचे मालक अब्दुल रहेमान खान ऊर्फ सद्दाम, अब्दुल हमीद खान हे त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्याकडे आॅईल उत्पादनाच्या परवान्याविषयी विचारणा केली असता त्यांनी महाराष्ट्र दुकाने व अस्थापना अधिनियमांतर्गत पुणे येथील एक्सएल आॅईल विक्रीचा नोंदणी दाखला असल्याचे सांगितले. तसेच आॅईल उत्पादित करण्यासाठी लागणारा परवाना सादर करण्यास अवधी मागितला होता. पोलीस पथकाने पंचनामा केला असता या ठिकाणी ३ लाख १५ हजार ८०० रुपयांचे साहित्य मिळून आले. या साहित्याद्वारे खुल्या आॅईलच्या मिश्रणातून एक्सएल आॅईल या नावाचे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी लागणारे आॅईल उत्पादित केल्याचे निदर्शनास आले. या आॅईलच्या सीलबंद पाकिटांवर एसआर नं.४८/३/शिवाजी चौक, चंदननगर पुणे असा पत्ता दिसून आला. प्रत्यक्षात आॅईल परभणी येथे तयार करीत असताना उत्पादनाचा पत्ता पुणे येथील आढळला. तसेच उत्पादनावर एपीआय व आएसओ: ९००१: २००८ हे मार्क वापरल्याचे आढळून आले. या सर्व प्रकरणात बनावटपणा असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच आॅईल उत्पादनाचा परवाना सादर करण्याचा अवधी देऊनही तो ११ दिवसांत सादर न केल्याने वरिष्ठांच्या आदेशावरुन ३ मार्च रोजी किशोर नाईक यांच्या फिर्यादीवरुन अ.रहेमान खान अ.हमीद खान यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे हे तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
४या कारवाई दरम्यान पोलिसांना त्या ठिकाणी एक हत्यार आढळून आले. ते जप्त करण्यात आले आहे. तसेच उत्पादनांवर एपीआय हा मार्क परवाना नसताना व उत्पादनाचाच परवाना नसताना आयएसओ नामांकन देखील वापरल्याने निदर्शनास आले.

Web Title: Parbhani: Print Texture On Oil Production Factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.